• Sat. Dec 21st, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

NATYAKALA LEKHMALA / नाट्यकला लेखमाला भाग ७

नमस्कार मित्रांनो आज भाग सातवा कित्येक वेळा दोन कल्पनातीत विरोध स्पष्ट करण्यासाठी आवाजाचा चढ उतार करावा लागतो . भावबंधन या नाटकातलीच ही दोन वाक्यें उदाहरणादाखल मी रेकॉर्डिंग करून पाठवतो रेकॉर्डिंग करून पाठवतो ऐका.@दोन्ही वाक्यातील दोन भागात असलेला विरोध स्पष्ट करण्यासाठी प्रत्येक वाक्यातील दुसरा भाग उच्चारताना आवाज किंचित चढवावा लागेल . आचार्य अत्रे यांच्या ‘जग काय म्हणेल’ या नाटकातला पुढील उतारादेखील मी तुम्हाला ऐकवणार आहे @संवादपद्धती मित्रांनो भाषण व संवाद यात भेद आहे संवाद हा दोन किंवा अधिक व्यतित होत असतो .दोन पात्र रंगभूमीवर आहेत अशी कल्पना करून त्यापैकी एक पात्र बोलत असत त्यावेळी दुसर्या पत्राने स्वस्थ बसून राहायचं काय त्याचं उत्तर असे की हो स्वस्थ बसावे परंतु तो स्वस्थपणा सार्थ असावयास पाहिजे. निरर्थ निर्जीव असता कामा नये.नव्याने काम करणारी नटमंडळी आपले भाषण म्हणून झाल्याबरोबर सुटलो अशा एकदाचा अशा भावनेनं ते प्रेक्षकांकडे किंवा इकडे तिकडे पाहत असतात .दुसरे पात्र काय बोलतात याकडे लक्ष देण्याची आवश्यकता भासत नाही .त्याचं भाषण कुठे संपत हे त्यांच्या लक्षात असत ते संपल की आपल भाषण सुरु करायच एवढंच त्यांना माहीत असतं .या गोष्टी बाधक आहेत बोलणार्या पात्राला जसं बोलण्याचं काम करायचं असतं तसं ऐकणार्या पात्राला ऐकण्याचं कार्य करायच असते,याचा पुष्कळ नटाना विसर पडतो.सामान्य व्यवहारात आपण इतर वेळेला वागत असताना दुसरा मनुष्य बोलत असता आपण काय करीत असतो असतो या गोष्टींचा नटाने विचार करायला हवा. एक पात्र बोलत असताना दुसर्या पत्राने त्याच्या बोलण्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे इतकंच नाही तर त्यांच्या बोलण्याची आपल्यावर झालेली भावनात्मक प्रतिक्रिया बोलत असताना दुसर्या पत्राने त्याच्या बोलण्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे इतकंच नाही तर त्यांच्या बोलण्याची आपल्यावर झालेली भावनात्मक प्रतिक्रिया अभिनयाच्या द्वारे दर्शविणा ही आवश्यक आहे यालाच भावनात्मक प्रत्युत्तर(Response ) म्हणतात . recording पाठवतो.क्रमशः

गुरुदत्त लाड .

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !