२००१ साली ज्यांनी ज्यांनी कॉम्पुटर आणि मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टिम वापरली आहे त्यांच्यासाठी हि प्रतिमा नवीन नाही कारण तेव्हा प्रत्येकाच्या डेस्कटॉप ला हा फोटो असायचा जो पाहायला अतिशय सुखदायक वाटायचं.
चला तर जाणून घेऊया या फोटो बाबत अधिक माहिती. जानेवारी १/१९९६, मध्ये, ओरिअर नावाचे अमेरिकन फोटोग्राफर कॅलिफोर्नियामधील नापा आणि सोनोमा, येथे हायवे नंबर १२/१२१ रस्त्यावर वाहन चालवत होते आणि महामार्गाच्या बाजूला असलेल्या हिरव्यागार डोंगराचा फोटो त्यांनी काढला. ओरिअर यांनी हा फोटो मामिया कंपनीच्या medium फॉरमॅट कॅमेरा आरझेड 67 ने हे छायाचित्र काढले. त्यांनी हा फोटो बूकोलिक ग्रीन हिल्सच्या नावाखाली वेस्टलाइटला सादर केला. वेस्टलाइट 1998 मध्ये कॉर्बिसने विकत घेतली होती, त्यावेळी मायक्रोसॉफ्टने वापरलेल्या अनेक स्टॉक फोटोग्राफी एजन्सीपैकी हि एक एजन्सी होती.
मायक्रोसॉफ्टने २००१ मध्ये विंडोज एक्सपीच्या नवीन ऑपरेटिंग सिस्टमसाठी ओरिअर यांचा हा फोटो निवडला, त्यावरील सर्व हक्क त्यांनी विकत घेतले. मायक्रोसॉफ्टने त्या प्रतिमेचे नाव ब्लिस असे ठेवले आणि ते विंडोज एक्सपीच्या डीफॉल्ट थीमसाठी डीफॉल्ट डेस्कटॉप वॉलपेपर म्हणून वापरले.
मायक्रोसॉफ्टने ही प्रतिमा निवडण्यामागचे कारण सांगितले कि हि ऑपरेटिंग सिस्टिम वापरताना त्यांना त्यांच्या “ग्राहकांना डिफॉल्ट डेस्कटॉप च्या माध्यमातून स्वातंत्र्य, शक्यता, शांतता, कळकळ इ. प्रदान करायचा प्रयत्न करायचा होता.
या छायाचित्राचे खास वैशिष्ठ्य म्हणजे हे चित्र कोणत्याही प्रकारचे एडिट केलेले नाही ओरिअर यांनी जसे काढले तसेच्या तसे हे मायक्रोसॉफ्टद्वारे वापरण्यात आले होते. परंतु या फोटो संदर्भात ओरिअर यांच्यावर असेही आरोप झाले कि हा फोटो फोटोशॉप एडिटेड अथवा फोटोशॉप मध्ये तयार केला गेलेला आहे. यानंतर त्यांनी तसा अहवाल देखील सादर केला कि हे छायाचित्र वेस्टलाइट मध्ये जसेच्या तसे सादर केले गेले होते. हे छायाचित्र मायक्रोसॉफ्टने त्यांच्या येस यू कॅन या सॉफ्टवेअरची जाहिरात करण्यासाठी 200 दशलक्ष डॉलर्सच्या जाहिरात मोहिमेचा भाग बनली होती आणि बर्याच विडंबनांचा विषय देखील बनली होती.
-रवींद्र नलावडे