• Sat. Dec 21st, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

KAVITECHI RECIPE / कवितेची रेसिपी

साहित्य:

१. एक खोवलेलं मन : (टीप शक्यतो स्वतःचेच वापरावे.)

२. ४ ते ५ आठवणी : सुखांत भिजलेल्या किंवा दु;खात भाजलेल्या.

३. वितभर किंवा तुमच्या अपेक्षेनुसारताजी स्वप्न: स्वप्नांना वापरायच्या आधी त्यांना एकत्र करून रात्रीच्या चाळणीतून चाळून घ्यावे. कारण त्यांत तुमच्या तुटलेल्या काही काहीस्वप्नांचे तुकडेत्यांत आढळण्याची शक्यता असते.

४. एकआयुष्य: याचे तुम्ही तुकडेही वापरू शकता किंवा तुमच्यागरजेप्रमाणेइतर कुणाचेही वापरू शकता.

५.प्रेम: सर्वात महत्वाचा हा घटक. आपल्या चवीनुसार टाकावे.

कृती:

प्रथम एक खोवलेलं मन घ्यावं व त्याला स्वच्छ अश्रूंनी धुवून काढावे. घट्ट पिळून थोडावेळ वाळत घालावे. दिवसा सूर्याच्या प्रकाशांतआणि रात्र असेल तर चंद्राच्या उजेडांत. थोडाही ओलसरपणा चालणार नाही, नाहीतर तुमच्या कवितेची मूळ चवं बदलू शकते. त्यानंतर त्या ४ ते ५ आठवणी (निवडलेल्या आणि भिजलेल्या किंवा भाजलेल्या ) एकत्रकराव्यात, आणि ती चाळून पाखडलेली स्वप्नही त्या मिश्रणात घालावी. आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे मळून घ्यावे व थोडावेळ भिजत ठेवावे. थोड्या वेळानंतरआयुष्यालाया मिश्रणाने चांगले मारिनेटकरावे. वरून चवीप्रमाणे थोडे थोडे प्रेम त्यात घालत रहावे. आणि पुन्हा त्या मिश्रणाला भिजू द्यावे.

          मिश्रण चांगल्या प्रकारे मुरल्यावर त्या मिश्रणाचे वेगवेगळ्या शब्दांच्या आकारांचे गोळे बनवून त्यांना एका स्वच्छ कोऱ्या कागदावरएकएक करून वाळत घालावे.

          तुमच्या कवितेला चांगला रंग चढण्यासाठी त्या शब्दांना वाळत घालायच्या आधी त्यांना तुमच्या भावनेच्या वर्खानी चांगल्या प्रकारे माखून घ्यावे. कवितेची चव व रंग दोन्ही छान येतील.

          सर्वात शेवटी या तयार असलेल्या कवितेला तुम्ही इतर लोकांपर्यंतही पोहचवू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही त्यांना “Whatsapp, फेसबुक, चिवचिव बाजार (Twitter) किंवा Youtube वर किंवा तुमच्या वेबसाईटवर ” अगदी कुठेही या कवितेला अपलोड करू शकता.

          जर वरीलपैकी कुठल्याही सोशल नेटवर्कवर तुम्ही नसाल तर तुमच्या त्या रुचकर कवितेला तुमच्या घरातील एखाद्या कपाटातल्या वहीतही ठेवू शकता. त्या आयुष्यभर ‘WITH NO EXPIRY DATE’ताज्याच राहतील.

 ताजा कलम:

* चव एकसारखीच असल्यास तो निव्वळ योगायोग नसून कुणी भुकेल्याने तुमच्या कवितेची कॉपीपेस्ट केले असेच समजावे.

** प्रत्येकाच्या कवितेचे साहित्य, कृतीआणि तिला लागणारा वेळ हे वेगवेगळे असू शकतात.

***तर मंडळी कशी वाटली रुचकर कवितेची रेसिपी तुम्हाला? आवडली असेलच. तशी सोपी आहे. पण तुम्ही त्यांत अजून वेगवेगळे साहित्य टाकून त्याची चव अजून रंगतदार बनवू शकता आणि कुठे कुणाला पोस्ट करायची हे ही तुम्ही वेगळ्या प्रकाराने ठरवू शकता.

स्वाती निरंजन

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !