हल्लीच्या या जगात ‘सवांद’ हा शब्द अदृश्य झाला आहे असे मला वाटते. घरातली माणसेच एकमेकांना भेटत नाहीत. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त असतात.
सवांद म्हणजे काय आदान – प्रदान, देवाण – घेवाण. थोडक्यात सवांद म्हणजे आपल्या मतांचा आदान -प्रदान किंवा देवाण – घेवाण होय. ‘सवांद’ हा प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा एक महत्वपूर्ण घटक आहे. पण हा घटक या धकाधकीच्या जीवनामुळे लोप पावला आहे. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा चालू आहे. पुरुष, स्त्रिया, मुलं सर्वजण या स्पर्धेच्या रगाड्यात वाहून गेली आहेत. आई वडिलांना मुलांशी सवांद साधायला वेळ मिळत नाही. प्रत्येक आई वडिलांची उच्च असते की आपण आपल्या मुलांशी सवांद साधावा पण त्याच्याकडे वेळच नाहीय. सवांद परस्परांमध्ये होणं खूप गरजेचं असत.
माणसामाणसांमध्ये सवांद साधला गेला नाही तर खूप प्रॉब्लेम होतात. आजकाल तंत्रज्ञान एवढं प्रभावी झालं आहे की त्यामुळे माणसं एकमेकांना विसरूनच जातात. मोबाईल हा प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे. सर्व गोष्टींची माहिती मोबाईल मध्ये मिळते. माणसाला जरा वेळ मिळाला की प्रत्येक माणूस मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसतो. लहानमुले मोबाईलवर गेम्स खेळात बसतात.
आजकाल आत्मसंवाद ही साधला जात नाही. कितीजण आपल्या स्वतःच्या मनाशी सवांद साधतात, कितीजण मनाला विचारतात की आपण जे काळासोबत धावतो आहोत ते योग्य आहे का?आपल्याला नक्की काय हवं आहे? आपल्याला कुठे थांबायचं आहे? हे सर्व प्रश्न पण आपण विचारू शकत नाही आपल्या मनाला. कारण आपल्याकडे वेळच नाहीय.
सवांद नसेल तर आपण एकमेकांशी जोडले जावू शकत नाही. आपले विचार इतरांना सांगू शकत नाही. इतरांचे विचार समजून घेऊ शकत नाही. कुठल्याही विषयावर चर्चा करू शकत नाही. महत्वाचे मुद्दे पटवून देऊ शकत नाही. आपापसातले वाद मिटवू शकत नाहीत. थोडक्यात सवांद नसेल आयुष्यत आपण काहीच करू शकत नाही.
एकाद्या लहान बाळाला घास भरवताना सुद्धा आई त्याला सांगते एक घास चिऊचा, एक घास काऊचा आणि त्याच्याशी तो बोलत राहते. हा आपण एक प्रकारचा सावंडच आहे. ते लहान बाळ बोलू शकत नाही पण त्या संवादाने ते बाळ हसत, जेवत. जेव्हा आईच्या पोटात बाळ वाढत असत तेव्हा ती आई रोज त्या बाळाशी बोलत असते का तर ते नातं अधिक घट्ट व्हावं म्हणून. हा पण एक प्रकारचा संवादच आहे.
आपण सर्व सिनेमा, मालिका, नाटक बघतो. पण जर या सर्व कलाकृतींमध्ये संवादच नसेल तर काय उपयोग? कुठल्याही कलाकृतीची म्हणजे कलाकृती दर्जेदार होण्यासाठी चांगले सवांद असणं आवश्यक आहे. कारण सवांदामुळे ती कलाकृती श्रोत्यांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहचते. ‘सवांद’ हा या कलाकृतींचा आत्मा आहे. जस पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही तसं सवांदाविना या कलाकृतींमध्ये जीव नसतो. म्हणून माझी आपल्या सर्वाना विनंती आहे एकमेकांशी सवांद साधा, एकमेकांच्या मतांची देवाण घेवाण करा आणि आयुष्य अर्थपूर्ण बनवा.
सुरुची वीरकर