भारत देश लवकरच प्रगत राष्ट्र घोषित होईल . या राष्ट्राच्या निर्मितीमधे विशेषता महाराष्ट्राच मोठ योगदान आहे.आजचा आपला आधुनिक महाराष्ट्र पाहताना आनंद वाटतो यंत्र आणि तंत्रज्ञानात आलेली समृद्धि थक्क करणारी आहे ,या समृद्धीला स्वतःच्या खांद्यावर पेलुन नवक्षितिजाकड़े घेवून जाणाऱ्या या नव्या पिढितील माझ्या ग्रामीण तरुणाबद्दल मला थोड़ बोलायच आहे, सध्या रुजत असलेल्या नव्या आधुनिक संस्कृतिच स्वागत आहे, तिला मी शिवार -सायबर culture अस संबोधतो कारण गावा-गावातून वसनारा हा आपला महाराष्ट्र आहे आणि याच गावांतील हा ग्रामीण तरुण परंपरागत शेतीवरुन आता टीबक सिंचन poly houses अशी प्रायोगिक शेती करुन अनेक नवनवीन फळ फुल व् भाज्यांचे उत्पन्न घेवून ते विदेशी निर्यात करत आहे शेताच्या बांदावरून सुरु झालेला त्याचा हा प्रवास आता मक्या पासून मॅक डोनल्ड ते शेरापासून शेअर मार्केट पर्यंत येवून पोहचला आहे.
हे लोक शहरांच एक नवीन रूप घड़वायच काम करत आहेत ज्यांची ओळख आता फ़क्त एक ग्रामीण तरुण म्हणून न राहता ते मोठे उद्योजक, व्यावसायिक ,राजकीय ,सामाजिक हस्ती अशी होत आहे ,ज्यानी पुणे ,औरंगाबाद,नाशिक,नागपुर किंवा अगदी मुंबई चाही बदलता आधुनिक चेहरा घडवन्यामधे मोलाच योगदान दिल आहे;याचबरोबर महाराष्ट्राने कला,साहित्य तसेच पत्रकारिता आणि चित्रपट क्षेत्रामधील गाठलेल्या उंचीमधेहि असच योगदान या ग्रामीण युवकांच आहे ,ही नवीन पिढी नवीन संकल्पना ,कल्पकता घेवून शहरांकडे येत आहे आणि आपल्या आंगिभूत असणाऱ्या परिश्रम,सचोटि,सातत्य ,अभ्यासुवृत्ति व जिद्दीच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करत आहे आणि शहरानाही एक नविन आकार देऊ पहात आहे.
म्हणूनच या सर्व कर्मयोगी जनांचा समाजमना द्वारा उचित सन्मान व्हायला हवा, ग्रामीण व शहरी असा उपहासात्मक भेदभाव केला जावु नये, खासकरुण माझ्या चित्रपट क्षेत्रामधे मला हे प्रकर्षाने जाणवते, माध्यमांवरती ग्रामीण पार्श्वभूमी किंवा कथाविस्तार असणाऱ्या चित्रपटांच्या निर्मात्यांचा,निर्देशकांचा उल्लेख, ग्रामीण चित्रपटकार असा केला जातो हे पाहता ऎसे भासते की येत्या काळात पुरस्कार वितरनसोहळ्यात Rural cinema अशी एक वेगळी category सुरु होवू शकते ! माझ्या मते कलेला कोणती जात नसते किंवा भाषा आणि प्रदेशांच बंधनहि नसत मग ग्रामीण चित्रपट अशी वेगळी प्रतवारी कशासाठी ? टिंग्या,फंड्री,ख्वाडा,झिंग चिक झिंग यांसारक्या अनेक दर्जेदार कलाकृतीनी सिनेमाच्या मूळ प्रवाहात येवून मिळवलेल दनदनित यश आपन पाहिल आहे .
मुळातच कोनीही मानुस मग तो शहरांमध्ये रहात असेल किंवा अगदी विदेशात रहात असेल किंवा अगदी चंद्रमोहिम करुन आलेला असेल; प्रत्येकाची पाळमूळ ही शेवटी येवून कुठल्यातरी गावच्या वेसीवर थांबलेली असतात, प्रत्येकाच्या आत्मचरित्रामध्ये एक गोष्ट गावाकड़चि लिहिलेली असते , प्रत्येकाच्या ऋदयात एक आठवण गावाकड़चि साठवलेली असते.
त्यामुळ अगोदरच एवढे भेदाभेद अस्तित्वात असताना अजुन ग्रामीण व शहरी असा वेगळा भेदभाव नसावा अस मला वाटत .
आपला
तात्या ननावरे