छोट्या मुलीप्रमाणे वाटे परीच कविता
झाली जरी कितीही मोठी बरीच कविता
भन्नाट कल्पनांचे झाले कवी दिवाणे
आता कुठे कुणाला येते खरीच कविता
प्रेमात माझिया ती नक्कीच मुग्ध झाली
ओठावरी तिच्याही आली तरीच कविता
शोधू कुठे कशाला स्वप्नातल्या ठिकाणी
प्रत्यक्ष नांदणारी माझी घरीच कविता
झाले जरी जिणेही वैशाख ऊन केव्हा
रक्तात धावणाऱ्या श्रावणसरीच कविता
- ©प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, लातूर
- email : drsantoshkulkarni32@gmail.com