चालताना
बोलताना
हसताना
रडताना
विचार करताना
चहा पिताना
वडापाव खाताना
नाचताना
खेळताना
राजकारण करताना
प्रेम करताना
हेवा करताना
मैत्री करताना
शत्रुत्व घेताना
भव्य काही करताना
थुकराट काही करताना
सतत
सतत
सतत
भीति वाटत राहते
केव्हा कुठल्या पुलावरुन
आपण खाली कोसळू
किंवा
कुठला पूल केव्हा
आपल्यावर येऊन कोसळेल ?
(उपोद् घात :-
पण म्हणून
काहीच करायचं नाही
असं ठरवलं
तर
आपल्या
आयुष्याचाच पूल
कोसळून
जायची भीतिही आहेच..)
- श्रीनिवास नार्वेकर©