सुख म्हणजे नक्की काय असत
निराशेच्या गर्ततेत आशेचा किरण म्हणजे सुख असत
सुख म्हणजे नक्की काय असत
अचानक मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी म्हणजे सुख असत
सुख म्हणजे नक्की काय असत
आई वडिलांच निस्वार्थी प्रेम म्हणजे सुख असत
सुख म्हणजे नक्की काय असत
भान हरपून निखळपणे हसण म्हणजे सुख असत
सुख म्हणजे नक्की काय असत
मनासारखा जोडीदार मिळण म्हणजे सुख असत
सुख म्हणजे नक्की काय असत
निरागस बाळाच हसण म्हणजे सुख असत
सुख म्हणजे नक्की काय असत
रुसल्यावर कोणीतरी आपल्याला मनवण म्हणजे सुख असत
सुख म्हणजे नक्की काय असत
दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानण म्हणजे सुख असत
सुख म्हणजे नक्की काय असत
दिवसभर राबून रात्री शांत झोप लागण म्हणजे सुख असत
सुख म्हणजे नक्की काय असत
आपल्या आजूबाजूलाच ते असत
आपण फक्त ते शोधायच असत
कवयित्री – सुरुची वीरकर