नापिकीच्या बारोमासी
चक्रव्यूहात फसलेल्या माया बापाले..
काकरात बी सोळनं माईत होतं…
“खुरपळनं” बी खाल्ल्याच्यानं अगाईत पुर निंगालचं नाई….
“बिजवाई” साठी घेतलेल्या सावकाराच्या कर्जातून बाहेर निंघन माहीतच नव्हतं “अभिमन्यू सारखं”…..
मग उरलेल्या अगाईतावर “हल्ला” केला….
“अधर्मी”… नाकतोळयाईनं….
अनं तुटून पळले….
महाभारतातील “शकूनी” “दुर्योधन” “दुशासनासारखे”…..
अगाईतावर…..
वस्त्रहरणं केल्यागत…
माहा बापाच्या “बारोमासी नापिकीवर……
अजूनही दिसते मले चिरंजीवी अस्वस्थाम्या सारखा…..
माहा बाप.. सपनातं…
नटसम्राटा सारखा…..
कापसाची फुलं हाती घेऊन…
भाव देता का? कुणी भाव..!
हमीभाव….
माया कापसाच्या फुलाले….
राजेश एस काटोले
कौलखेड अकोला