कर्मवीर खरेखुरे
ठसा पक्का कर्तृत्वाचा
चिरंतन स्मरणात
कार्यालेख दातृत्वाचा.
ठामपणे उभा आहे
वटवृक्ष शिक्षणाचा
सदोदित ज्ञानरूपी
दीपस्तंभ समाजाचा.
स्वावलंबी शिक्षणाने
मार्ग खुला प्रगतीचा
दिले शिक्षण मूल्यांचे
वारसाही संस्कृतीचा.
ज्ञानगंगा खेडोपाडी
वसा पवित्र कार्याचा
आजतागायत आहे
स्त्रोत येथे सत्कार्याचा.
गोरगरिबांच्यासाठी
आधारही आश्रमांचा
मन जाणले सर्वांचे
केला विचार व्यथांचा.
खूप वाटतो आदर
भाऊराव पाटलांचा
एक आदर्श सत्वर
आम्हा सर्व बांधवांचा
सौ. माधुरी काकडे.
जिल्हा :- पुणे