• Thu. Dec 19th, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

KARMAVEER BHAURAO PATIL / कर्मवीर भाऊराव पाटील

आपण केलेल्या कर्माचे फळ
बहाल केले लोकांनी आपणास
‘कर्मवीर’ ही पदवी संत गाडगेबाबांनी
सार्थ ठरवलात या बहुमानास //१//

तळागळातील बहुजन समाजासाठीची तळमळ
शाळा तिथे वस्तीगृहाचा स्थापनेचा रथ
गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत ज्ञानगंगा पोहोचविणारे तुम्ही आधुनिक
भगीरथ //२//

कमवा व शिका हा आपला मंत्र
श्रमातून स्वावलंबी शिक्षण हा नवा मार्ग शिक्षणाचा
22 सप्टेंबर आपला जन्मदिवस
महाराष्ट्रात श्रमप्रतिष्ठा दिवस हा मानाचा //३//

जरी घेतले सहावी पर्यंतचेच शिक्षण
रयत शिक्षण संस्थेचे आपण संस्थापक
संस्थेचे रोपट्याचे वटवृक्षात केले रूपांतर
स्वावलंबन स्वातंत्र्य स्वाभिमान स्वाध्यायाचे अध्यापक //४//

झाले पावन पायगोंडा पाटील व गंगाबाई
सार्थ केले नाव आई-वडिलांचे
सुशील पत्नी लक्ष्मीबाई प्रेरणास्रोत
वारे वाहू लागले शैक्षणिक बदलांचे //५//

महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन
पदव्या डिलीट कर्मवीर पद्मभूषण
कर्मवीर केवळ एक व्यक्ती नव्हे तर संस्था
आम्हां महाराष्ट्रीयनासाठी नेहमीच ठरलात भूषण //६//

कार्यकर्त्यांच्या मालिकेतील शिरोमणी
घडवला प्रत्येक विद्यार्थी प्रामाणिक आचारशील
श्रमाचे,ज्ञानाचे प्रतिष्ठा वाढवणारे शिक्षणमहर्षी
बनवलात आपण प्रत्येक विद्यार्थी विनयशील //७//

सौ.सुरेखा चौंडे / कानडे नळेगाव.लातूर.

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !