नभात बसूनी कन्हू सावळा
इंद्रधनूचा वाजवी पावा ।
यमुना राधा तरसे अवनी
नितळ तयावर बरसुनी जावा।
जगांस दिसती हसऱ्या लहरी
तळास वाहे विरह लाव्हा।
दूssर तेथूनी भुलवी मजला
मल्हाsर अवचित कोणी गावा।
सहस्त्र तारकांचा तो राणा
मम प्राक्तनी कशास यावा।
मेघ सावली पडता मजवर
पदर किनारी तो सरकावा।
कधी कोसळे अवकाळी तो
तप्त गांव हा चिंब नहावा।
प्रणयपुराचा प्रलय येता
‘कन्हूप्रियेवर’ लाविती दावा।
राजससुकुमार