काल धरेची ची शादी झाली।
हिरवा पिवळा शालू ल्याली।
नभी मेघ तो ढोल वाजीवी।
वाऱ्याने मंगल अष्टक गावी।
बिजली वाजे कडकड ताशा।
सरसर सर येई बाहु पाशा।
पावश्याची ती घुमे सनई।
ओहळ ओढे वाही व्याही।
आसुसलेले बीज तरारे।
सृजनाचे ते देते ग्वाही।
वरुणाच्या त्या थेंबा मधुनी तप्त भुईची आई झाली।
आज धरेची शादी झाली….
-राजेश देशपांडे