• Fri. Dec 20th, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

RESPECT / रिस्पेक्ट भाग ४

Bywachankatta

May 1, 2021 ,
MARATHI STORY,RESPECT FOR LOVE, MARATHI STORY

अर्थवला असं जमिनीवर पडलेलं पाहून अंबरीश ‘यार अर्थव’ असं रडवेल्या स्वरात म्हणत खाली बसतो आणि त्याचं डोकं स्वतःच्या  मांडीवर घेतो. त्याच्या नाकाजवळ आपलं बोट धरून त्याचे श्वास चेक करतो; त्याला काहीच श्वास जाणवत नाही. अंबरीश भीतीने, दुःखाने पूर्ण थरथरत असतो. आपल्याला आत्ता काहीच समजत नाहीये आपण खूप घाबरलेले आहोत. अर्थवला काहीच झालेलं नाहिये असं स्वतःला समजावत त्याच थरथरत्या हातांनी अंबरीश ऍम्ब्युलन्स कॉल करून बोलवतो. अंबरीशच्या  घराजवळच हॉस्पिटल असल्याने दुसऱ्या मिनिटाला ऍम्ब्युलन्स तिथे येते आणि अंबरीश अर्थवला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. हॉस्पिटलमध्ये पोहचताच डॉक्टर्स अर्थवला क्यॅजुलटी मध्ये घेऊन जातात.अंबरीश नुसता घाबरलेल्या स्थितीत सगळं बघत राहतो..

तितक्यात त्याला अवानीचा फोन येतो. तो अधाश्यासारखा तिचा फोन उचलतो आणि ती तिकडून काही बोलायच्या आतच तो म्हणतो, ‘यार अवू, अर्थव बहुतेक गेलाय यार!’ ती तिकडून काहीतरी बोलते; पण अंबरीश पर्यंत एकही वाक्य पोचत नाही कारण तो  काही ऐकायच्या मनःस्थितीत च नव्हता. तो नुसता रडत अवनीला सांगत होता..’अवू, त्याचा श्वास पण लागत नव्हता यार मला, थंड पडला होता तो. मी लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो, पण डोन्ट नो! अवु, मला खूप भीती वाटतेय.’

अवनीलाही हे सगळं ऐकून धक्का बसतो. ती ताबडतोब अंबरीशकडे जायला निघते.

तिला हॉस्पिटल मध्ये बघताच अंबरीश जवळ जवळ धावतच तिच्या जवळ येत तिला मिठी मारतो अणि एवढ्या वेळ कसाबसा स्वतःला सावरुन धरलेला तो, तिच्या मिठीत पडताच धायमोकलून लहान मुलांसारखा हुंदके देत रडायला लागतो.. अंबरीशची ही अशी अवस्था पाहून अवनीच्याही डोळ्यांत पाणी येतं..ती त्याला समजवायच्या सुरात म्हणते, ‘ अंबरीश,अथर्वला काही नाही होणार!’ असं म्हणताच अंबरीश त्याची मिठी आणखीनच घट्ट करत हुंदके देऊन रडायला लागतो आणि रडता रडता सांगतो,  ‘अथर्व नाही येणार आता परत कधीच;गेला तो! अवू, अथर्व गेला! माझ्यामुळे गेला!’

अथर्व हे जग सोडून गेलाय हे समजल्यावर अवनीलाही तिचं रडणं आवरता येत नाही.५ वर्षांपासून जशी ती अंबरीशशी जोडली गेली होती तशीच त्याचा जिगरी दोस्त म्हणून अथर्वशीही तिचं असं वेगळं एक नातं तयार झालं होतं. त्यामुळे हे असं अचानक त्याच्या जाण्याने अवनी पण आतून हादरली होती. तरीही ती स्वतःला सांभाळते आणि अंबरीशला हॉस्पिटलच्या बाहेर घेऊन येते. दुःखात असली तरी अवनी भानावर होती. तिचं पत्रकारितेचं संशयाचं डोकं अजूनही शाबूत होतं. अंबरीश थोडा शांत झाल्यावर ती त्याला विचारते, ‘अंबरीश, अथर्व तुझ्यामुळे गेला असं का म्हणालास तू?’ असं विचारताच अंबरीशच्या डोळयात पुन्हा पाणी येतं.तेव्हा थोडं दटावूनच अवनी त्याला म्हणते,’अंबरीश मला कळतंय तुला खूप त्रास होतोय आत्ता, पण अंबरीश, मला खूप काहीतरी मेजर लोचा वटतोय यार इथे! आणि त्यात तू असं काहीही बरळतोय की तुझ्यामुळे अथर्व गेला. प्लिज मला नीट सगळं सांग काय झालंय ते.

अंबरीश तिला सांगायला सुरुवात करतो,

‘अवू काल आम्ही अथर्वच्या डॉक्टर कडे गेलो होतो. म्हणजे  त्याच्या सायकॅट्रिक कडे. कालच्या सेशनलाही त्याने मला बोलावलं होतं’.

‘ कालच्या सेशनलाही म्हणजे? याआधी पण बोलावलं होतं का?’

‘हो! आठ दिवसांपूर्वीच पहिल्यांदा त्यांनी मला बोलावलं होतं आणि कालही.’

‘का बरं? एकदम अचानक काय झालं तुला बोलवायला?’

‘अगं डॉक्टरांचं म्हणणं होतं अथर्वचे मागच्या काही दिवसांपासून खूप सुसायडल थॉट वाटत  आहेत. त्यामुळे त्याला एकटं सोडणं रिस्की आहे, म्हणून तू त्याला तुझ्या घरी घेऊन जा. हे सांगायला त्यांनी मला बोलावलं होतं.आणि अथर्वला ह्याची कल्पना येऊ नये म्हणून त्यांनी मझ्यासोबात त्याचं सेशन घेतलं आणि सांगितलं की काही दिवस एकटं राहू नको म्हणून.आणि म्हणून अथर्व मागचे आठही दिवस मझ्याच सोबत होता. म्हणजे मझ्याच फ्लॅटवर राहत होता’.

‘ए, एक मिनिट!, एकटं राहू नकोस म्हणजे? मिनू घरात असताना त्याचा एकटा राहायचा काय संबंध?

‘अगं मिनू नुकतीच ८ दिवस तिच्या वडीलांकडे राहायला गेली होती .त्यामुळे तिला लगेच बोलावणं किंवा ह्याने तिकडे जाण बरं वाटलं नसतं म्हणून मला सांगितलं’.

‘म्हणजे काल रात्री पण तुम्ही दोघे सोबतच होतात ना?’

‘ हो! १० वाजेपर्यंत होतो सोबत. म्हणजे आधी आम्ही त्याच्या डॉक्टरकडे गेलो होतो. तिथेच त्यांनी सेशनमध्ये डीसट्रब नको व्हायला म्हणून आमचे मोबाईल घेऊन स्विच ऑफ केले होते. त्यामुळे काल मिनुने कॉल केले तेव्हा आमचे फोन बंद आले तिला. आणि त्यानंतर, तू आज ६ महिन्यांनी वापस येणार असं म्हणून मला तयारी करायला तुझ्या फ्लॅटवर जायचं होतं आणि मिनुही काल तिच्या वडिलांच्या घरून परत येणार होती त्यामुळे मला अथर्वची काहीच काळजी नव्हती. तो डॉक्टरांकडून थेट त्याच्या घरीच जाणार होता.पण काल पासून त्याने फोन उचलला नाही आणि तो घरीही गेला नाही असं म्हटल्यावर एकच गोष्ट उरली होती अवू, की तो पुन्हा मझ्या फ्लॅटवर गेला असणार. कारण तुला माहिती आहे आपल्या चौघांकडे एकमेकांच्या घरांच्या चाव्या आहेत. आणि अथर्वला माझ्या शिवाय कोणीच नाही. त्यामुळे तो दुसरीकडे कुठे जाणार? आणि काल नेमकं मी नव्हतो त्याच्यासोबत तर त्याला सुसायडल थॉट आले  आणि त्याने सुसाईड केलं. मी त्याला एकटं सोडायला नको होतं’

‘अंबरीश, यू मीन अथर्वने सुसाईड केलंय?’

‘ हो!’

‘हो म्हणजे? कसं केलं सुसाईड? काही खाल्लं?की चाकूने मारून घेतलं? की काय केलं?’

अवनीच्या ह्या प्रश्नांनी अंबरीशही त्याचं दुःख विसरून नेमकं काय घडलंय ह्यात आपलं लक्ष घालतो आणि तो अवनिला म्हणतो,

‘अवू यार, असं काहीच दिसलं नाही मला. म्हणजे तेव्हा माझं काहीच लक्ष नव्हतं, पण मी फ्लॅटवर गेलो तेव्हा अथर्व दारात पडला होता.बाकी रक्त , चाकू , तोंडाला फेस असं काहीच नव्हतं’.’

आता हे ऐकुन दोघंही जरा चमकतात. त्या दोघांच्या ही आता लक्षात येतं की हे दिसतंय त्यापेक्षा नक्कीच काहीतरी वेगळं आहे. मिनुचा सुसाईड आणि अथर्वचं मरण एकाच दिवशी? अथर्वचा मरण हे नैसर्गिक मृत्यू जरी गृहीत धरलं तरी अथर्वला तसा कसलाच आजार नव्हता. दोघांनाही कशाचीच टोटल लागत नव्हती. पण ह्या सगळ्यात अथर्वची बॉडी पोस्ट मारटम करायचा निर्णय ते घेतात आणि तशी प्रोसेस पूर्ण करून ते काही क्लू मिळतोय का हे तपासण्यासाठी अंबरीशच्या फ्लॅटवर जातात. तिथे त्यांना अथर्वने आत्महत्या केली आहे असं काहीच सापडत नाही. हे सगळं करण्यात त्यांचा बराच वेळ जातो. ते दोघेही शेवटी थकून बसतात. आवनी तिचा मोबाईल चेक करते तेव्हा तिला मीनुच्या बाबांचा मेसेज दिसतो, ‘मिनू शुद्धीवर आली आहे ‘ असं त्यात लिहिलेलं होतं. ते वाचून अवनीला खूप हायसं वाटतं. ती ही बातमी अंबरीशला सांगणार तितक्यात अंबरीश तिला त्याच्या मोबाईलवर नुकताच हॉस्पिटलने पाठवलेला अथर्वचा पोस्ट मारटमचा रिपोर्ट दाखवतो आणि ते वाचून अवनी आश्चर्य चकित होऊन म्हणते? 

‘व्हॉट? हे कसं शक्य आहे?’

क्रमशः भाग ५ वाचा https://wachankatta.com/marathi-story-respect-2/

-प्रांजली कुलकर्णी

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !