त्यागूनिया सिंहासन,
गाठलं त्यानं कानन।
भार्या त्याची निष्कांचन,
हवं झालं मृगकांचंन।
रेषा भुलली लक्ष्मण,
आनी झालं अवलक्षण।
रावनाच्या मोहा पायी ,
घडले ग रामायण।
जाळुनीया लंका सारी
मिळवली त्याने सीता।
एका धोब्याच्या नादान
जळली ती पतिव्रता।
राम राज्य आलं तरी
श्राप लागतो भोगन्या ,
गरभात मरताहे
अजूनही भूमी कन्या!
राजेश देशपांडे
rjsh.deshpande@gmail.com