• Mon. Dec 23rd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

ANMOL RATNA KARMAVEER ANNA / अनमोल रत्न कर्मवीर भाऊराव पाटील

महाराष्ट्रातील आणि भारतातील जनतेचे, शिक्षण चळवळीचे प्रणेते डॉ कर्मवीर भाऊराव पाटील


त्यागाचे,सहनशीलतेचे ,समाजशिक्षणाचे अतोनात वेड असलेले,मानवतेचे पुजारी, विचारवंत, विनयशील गुणवान भाऊराव पाटील यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे!ते स्वतः कष्ट करत शिकले आणि संदेश दिला कीकाम करतानाच शिकात्यांचे मत होते की वेळ वाया का दवडता?काम करता करता शिकण्यात मजा येते,कामाचा आनंद मिळतो त्याचबरोबर शिकणेही चांगले होते, खरंच आहे,एका दगडात दोन पक्षी तसे एकावेळी दोन्ही,कमावण्याचा आणि शिकण्याचा आनंद!!


रयत शिक्षण संस्था ही आपल्या राज्यातील नामांकित शिक्षण संस्था,१९१९मध्ये या संस्थेची पहिली शाळा. कराड तालुक्यातील काले. या गावी स्थापन केली शाळेबरोबरच वसतीगह सुध्दा,त्या काळात किती गरज ओळखून, दूरदृष्टी ठेवून सुरुवात केली!कालेछोटेसे गाव, फार कुणी तिकडे लक्ष देत नव्हते. तिथेच भाऊसाहेबांनी सुरू केले समाज शिक्षण,तेथे पाया रचला, जनतेला काय आनंद झाला, लोकांना वाटले. खरंच आपल्या गावात आपण शिकणार,कराडला एव्हढ्या लांब जायची जरुरी नाही?अहो तो आश्चर्याचा धक्का. पण त्या शाळेत शिक्षणाचा पाया होतो पक्का!
कर्मवीर भाऊराव पहिल्यांदा किर्लोस्कर कंपनीत कामाला होते परंतु तळागाळातील लोकांसाठी काम करायचा ध्यास त्यांना गप्प बसू देईना,

सातारच्या रयत शिक्षण संस्थेद्वारे शाळा काढून कामाला जोमाने लागले! एक उल्लेखनीय गोष्ट त्यांनी माणुसकी आपुलकी अप्रत्यक्ष शिकवली, त्यामुळे बाळाप्रमाणे शाळेला बाळकडू मिळाले,तेथे वागण्याचे योग्य धडे आणि छोट्या धंद्यांचे,शेतीचे ज्ञानही दिले जाते!!
बॅरिस्टर, डॉ कितीतरी पदव्या,किताब तरी फारच विनयशील!घराचे,देशाचे नाव रोशन केले!काम करताना. शीण आला. आता दमलो हे कधी त्यांच्या गावी नसायचे, खूप कष्ट करायचे ही आस! त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी शिक्षणाच्या कामासाठी वेळ पडता स्वतःचे दागिने विकले आणि पैसा दिला, किती त्याग, समोर आदर्श होता आणि खऱ्या आवश्यक कामाला मदत करण्याची इच्छा!!


कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विद्यार्थ्यांच्या तोंडचे उदगार ऐका आम्हाला सुविचारी शिक्षण या शाळेने दिले शाळा आमचे खरे दैवत, अजूनही माजी मुलांना विचारते.

छोटे देणगीदार शाळेचे सांगतात माणुसकीने चौकशी करणारी, मायेने आठवणीने फोन करणारी,कश्या आहात विचारणारी ही शाळा आम्हालाच देणगी वाटते, सत्पात्री दान देतो ते चांगले

आता ती शाळा चांगल्या प्रकारे करत आहेत हे बघून गावकरी, विद्यार्थी, देणगीदार सुखावतात,ह्याचे श्रेय कर्मवीर भाऊरावांना ,त्यांची शिकवण उपयोग पडते!त्यांची जिद्द. जिला तोड नाही, अहंकाराचा निशाणा नाही!अशा निगर्वी, शिक्षण प्रसारक,गरिबांचा शिक्षणाचा प्रश्न सोडवणारे,काम करुन काम करा सांगणारे शिक्षणतज्ञ यांना अभिवादन


मी शिक्षण क्षेत्रातील असल्यामुळे आणि आमचे सासरचे गावकाले यामुळे मला तर फारच आनंद होतो,त्यांच्यासारखेच आमचे लोक समाजकार्य, दानधर्म शिकले करतात नशिब माझे!
भाग्यवंत मी, शिकणार, आत्मसात करत रहाणार त्यांचे गुण, थोडेसे करावे ना !!

-प्रा. सविता आवारे नाशिक

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !