• Mon. Dec 23rd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

SHIKSHANMAHARSHI / शिक्षणमहर्षी

KARMVEER BAHURAO PATIL

समाजसुधारकांच्या जीवनगाथा
ज्या- ज्या वेळी महाराष्ट्र गातो
कर्मवीरांचे नाव आवर्जून
प्रत्येकजण आदराने घेतो……..१

शिक्षण होते जरी बेताचे
शिक्षणचळवळ आरंभिली
शिक्षणमहर्षी भाऊरावांनी
‘रयत शिक्षण संस्था’ स्थापिली….२

देवून ज्ञानसंजीवनी
बहुजनांना उद्धरिले
‘कर्मवीर’ ही पदवी देवूनी
महाराष्ट्राने गौरविले……३

शिक्षणाच्या या गंगोत्रीतून
अज्ञान सारे वाहून गेले
अयोग्य रुढींना फाटा देवून
विकासाचेही वळण लागले …..४

संघशक्तीची ताकद स्वतः
कृतीतून पटवून दिली
संस्कार देवून विद्यार्थ्यांना
समता,बंधुता रुजविली……५

‘कमवा आणि शिका’ योजना
गरिबांसाठी राबविली
स्वकष्टाने जीवन जगूनी
स्वावलंबनाची शिकवण दिली……६

‘महाराष्ट्राचे बुकर वाॕशिंग्टन’
पदवीचा या मिळाला बहुमान
डी.लिट,पद्मभूषण पुरस्कारांनीही
वाढविली महाराष्ट्राची शान……..७

कार्य भाऊंचे असामान्य
मुक्तकंठाने स्तुती करु
आदर्श घेवून कर्मवीरांचा
परिवर्तनाची कास धरु……..८

वैशाली निकम
औरंगाबाद

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !