तळमळ या समाज कार्याची
स्थापली रयत शिक्षण संस्था
गोरगरीब मुलांना शिकवाया
दाखवली कळकळ नि आस्था
कमवा व शिका योजनेखाली
साक्षर केले त्यांनी दलितांना
ज्योतिराव फुल्यांच्या साह्याने
वाहून घेतलेले शिक्षण प्रसाराला
वटवृक्ष बोधचिन्ह ठेवले होते
त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे
अजरामर झाले नाव आण्णांचे
त्राता बनले होते ते अस्पृश्यांचे
आई ती कर्मठ जैन घराण्यातील
भाऊरावांनी नाही मानली जात
खेळत बालपणी अस्पृश्यांसोबत
दिली समाजोद्धाराची पूर्ण साथ
श्रीमंत घरची लेक ती लक्ष्मीबाई
पत्नी म्हणून आयुष्यात प्रवेशली
शिक्षण प्रसारासाठी त्यांनी तिला
लंकेची पार्वतीच बनवून टाकली
पद्मभूषण पुरस्कृत भाऊराव
आजही होतेय त्यांचे स्मरण
पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या
करूया त्यांच्या कार्याला वंदन
सौ. भारती सावंत मुंबई