• Mon. Dec 23rd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

TALTIP / तळटीप

(Greetings to all the great luminaries of the literary world) MARATHI KAVITA TALTIP

(साहित्य जगतातील सर्व महान विभूतींना विनम्र अभिवादन करून)

प्रश्न शेवटी प्रतिष्ठेचा आहे ???
(मुक्तछंदातून)

हल्ली सर्रास नजरेस पडणारे
छोटा कवी-मोठा कवी हे प्रकार
फारच लाजिरवाणे बरं का?

मोठ्या कवींचा तोराच न्यारा
बरं बाबा, मोठा तर मोठा…
तू वयाने मोठा….म्हणून का?
अनुभवाने मोठा….म्हणून का?
स्वतःच्या नावावर काव्यप्रकार काढला म्हणून?
समूह प्रशासक आहेस म्हणून?
की चार दोन फुटकळ कार्यक्रमात
निमंत्रण आले म्हणून!
की वाटले तसे लिहिलेले
जबरदस्तीने,ठोकठाक करून
बाहेर आलेले कविता संग्रह
काढले म्हणून…!!!

एक महत्वाची तळटीप असावी
मोठ्या कवीच्या डोक्यात
मोठ्या कवीने देऊच नये
कधी नवोदितांच्या कवितेवर प्रतिसाद,
इच्छा असली तरीही बरं…!
वाढवू नये उत्साह,
सांगू नये तुम्हीही लिहू शकता म्हणून
हां, सांगितलीच एखादी चूक तर सांगावी तुच्छतेचा आव आणून !
अगदी कपाळावर आठ्या आणत
अहो असं कसं बोलता?
प्रश्न शेवटी प्रतिष्ठेचा आहे

कधी नवोदितांची एखादी कविता
चुकीच्या कचाट्यात सापडली की
तुटून पडावं त्यावर अधाशासारखं
चुका काढत ती कविता निष्प्राण होईपर्यंत

पण एक बाकी खरं आहे बरं का,
असा छोटेपणाचा विचार करणारा
कधीच मोठा नसतो
अन पहिली कविता लिहिणारा
सुद्धा कधीच छोटा नसतो

जे खरंच काव्यातून मोठे झाले त्यांचे
या स्वयंघोषित मोठ्यांनी थोडे तरी
अनुकरण करावं अन नसेल जमत तर
मोठ्यांना आदर देणे काय असते?
हे छोट्याकडून शिकावं?

शेवटी एकच प्रश्न?
वय जास्त असलं म्हणून का सर्वांनाच
सगळच समजतं का हो?
कवित्वाला, प्रतिभेला,काव्याच्या खोलीला
कोणी वयात मोजतं का हो ?

प्रविण जगन्नाथ बोपुलकर
खेट्री, जि अकोला

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !