नमस्कार !
नाटय़कलेसंबंधी लेख लिहिण्याची आपली योग्यता फार मर्यादित आहे मी नाट्य कलेबद्दल दैनिक जनशक्तीमधे नाट्यकला ही मालिका लिहिली होती. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये कडक निर्बंध असताना नाटक, मालिका , चित्रपट सगळे कलावंत सोशल मीडियावर बऱ्यापैकी वाचन करतात या क्षेत्रात येण्यासाठी नवनवीन कलाकार शिबिरं नाट्यविषयक माहिती गोळा करत असतात त्यांच्यासाठी आणि हे धाडस करण्याचं कारण म्हणजे कलेबद्दल मला वाटणारं विलक्षण प्रेम, आवड शाळा कॉलेजातून नाट्य प्रयोगात राज्य नाट्य स्पर्धा, प्रायोगिक रंगभूमी काही व्यावसायिक ,मालिका,चित्रपट यातला अनुभव म्हणून हा लिहिण्याचा प्रपंच .मित्रानो सत्याचा आभास निर्माण करणे हे नाटक .हेच उद्दिष्ट नाट्य निर्माण करण्यासाठी नटाला एका काल्पनिक सृष्टीत प्रवेश करावा लागतो आणि तो करतो थोडक्यात तात्पुरते तो त्या व्यक्तीचं जीवन जगत असतो रंगभूमीवर प्रवेश करताच नटाचा या काल्पनिक सृष्टीत प्रवेश होतो .नाटय़ यशस्वी होण्यासाठी या आभासात्मक क्रिया शक्य तितक्या स्वाभाविक होणे आवश्यक आहे नाट्य आणि कला या दोन्ही शब्दांमध्ये कृत्रिमतेचा अंश गृहीत धरावा लागतो . नाट्यातील कृत्रिमतेचे असेच आहे नाट्यास ती आवश्यक असते पण तिचे योग्य प्रमाणात साधले तरच नाट्य आकर्षक होते .कृत्रिमता भूमितेथील रेषेसारखी असते भूमितीत रेषेची व्याख्या अशी करतात की तिला लांबी असते परंतु रुंदी नसते याचा अर्थ रुंदी दिसते पण ती मापता येत नाही . चित्रकलेत ज्याप्रमाणे जितकी वास्तवता निर्माण होईल इतके चित्र आकर्षक होते त्याचप्रमाणे जीवनाचे चित्र नाट्यरूपाने रेखाटताना त्या त्या नटाला ही वास्तवता निर्माण करेल तितका त्याचा अभिनय आकर्षक ठरेल स्टँनिस्लाव्हस्की याने यासंबंधी आपल्या नाट्य वर्गातील विद्यार्थ्यांना एक धडा शिकवला एकदा तो येण्यापूर्वी त्यांचे विद्यार्थी रंगभूमीवर इकडे तिकडे करीत असता एका विद्यार्थ्याची पैशाची पिशवी हरवली सर्व विद्यार्थी हरवलेल्या वस्तूंचा कसून शोध करू लागले कुणी टेबलाखाली वागतो कुणी खुर्चीच्या मागे कुणी कुठे कुणी कुठे असा शोध चालू असता शिक्षक केंव्हा वर्गात आले हे विद्यार्थ्यांच्या ध्यानात आले नाही पिशवी सापडल्यावर त्यांनी पाहिलं शिक्षक त्यांच्या हालचाली सूक्ष्मपणे पाहत होते तेव्हा शिक्षक म्हणाले की तुम्ही हरवलेली वस्तू शोधण्याचा अभिनय उत्कृष्ट केला आता पुन्हा ती वस्तू तिथं पडली होती तिथे ठेवून द्या आणि ती हरवली आहे अशी कल्पना करून पुन्हा पूर्ववत तिचा शोध करा पाहू आता विद्यार्थी गडबडले ते म्हणाले तसे कसे होईल आता ती वस्तू काही हरवलेली नाही. ती कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे शिक्षक म्हणाले म्हणूनच ती हरवली आहे अशी कल्पना करून तुम्ही शोधण्याचा अभिनय करावयास मी सांगत आहे हा अभिनय विद्यार्थ्यांना नीट जमला नाही तेव्हा प्रत्यक्ष सत्य आणि रंगभूमीवरील सत्य काल्पनिक घटना सत्य असल्याबद्दल मनात उत्पन्न केलेला विश्वास दाखवणे जमायला हवे . उत्कृष्ट नटाच्या बाबतीतही उत्स्फूर्तता समरसता नेहमी प्राप्त झाली पाहिजे
क्रमशः लेखक – गुरुदत्त लाड