‘आत्महत्या म्हणजेच,मनाचा अपघात’ तो का होतो ? आणि कसा टाळता येईल यावर थोडस विचारमंथन पटलं तर शेअर करा
‘अपघातग्रस्त मनाचा आणखी एक बळी’ अस कुठं वाचायला मिळत नाही पण हे एक दुर्लक्षित सत्य आहे, होय अपघातग्रस्त झालेल सदृश्य शरीर डोळ्यांना दिसते त्याला झालेल्या जखमा डोळ्यांना दिसतात त्याच्यावर मलम पट्टी करता येते परंतु अपघातग्रस्त झालेल अदृश्य मन डोळ्यांना दिसत नाही , तेही जखमी होत रक्तबंबाळ होत पण डोळ्यांनी दिसत नाही आणि त्याच्यावर मलम पट्टी बांधता येत नाही यामुळेच उपचाराआभावी ते संपून जात आनि तो माणूसही स्वतःला संपवून घेतो आत्महत्येच्या कठोर निर्णयापर्यंत येऊन पोहोचतो आणि अचानक आपल्याला एखाद्या सकाळी बातमी पोहोचते तो गेला आणि आपल्याला प्रश्नचिन्ह पडते ? आपण त्याला शेवटचं पाहण्यासाठी पोहोचतो आणि कोणीतरी सांगते मला तो कालच भेटला होता आणि आपल्या डोळ्यात पाणी उतरते कारण जाणारा तो आपला कोणीतरी जवळचा असतो प्रिय असतो . मग अस वाटत किती बर झाल असत जर तो मला भेटला असता !! हम्म…. अरे पण काय फरक पडला असता ? तरीही हेच झालं असत कारण तो भेटला असता शरीराने पण त्याच्या त्या शरीरामध्ये असलेलं दुखावलेलं, हरलेल, हताश झालेलं त्याच निराश मन त्याचा निराश आत्मा आपण पाहू शकलो असतो का तो पाहण्याची कुवत आपल्यात आहेका ?
हो आहे ती कुवत प्रत्येकात आहे ! ती तेव्हा जागृत होईल जेव्हा आपल्या प्रियजनांना भेटताना ती भेट शेवटचीच समजून आपण भेटू जेव्हा निव्वळ शरीराने नाही तर आत्म्याने आपण भेटू संवादातून एकमेकांच्या मनांमध्ये डोकावून पाहू आणि त्याचवेळी आपला माणूस मनाने अपघातग्रस्त होऊन आपल्यापासून लांब जाणार नाही .
आपल्या सदृश्य शरीराला अपघात होण्याला अनेक कारणे असतात तो होऊ नये म्हणून रस्त्यावर चालण्याचे काही नियम आहेत कायदे आहेत जसेकी
वाहन सावकाश चालवा , हॉर्न वाजवा , हेल्मेट वापरा, सिटबेल्ट लावा ,वेगाची मर्यादा ओलांडू नका, वळनरस्ता वाहन हळू चालवा , ओव्हरटेक करू नका , अरुंद रस्ता , डु नॉट ड्रिंक अँड ड्राईव्ह, हाय बिम मारू नका, नो एन्ट्री , लेणची शिस्त पाळा असे …. ते मोडले की अपघात होण्याची शक्यता असते तशा पद्धतीचे सुचनाफलकही रस्त्यावर लावले जातात परंतु अदृश्य मनाला अपघात होऊ नयेत म्हणून आपल्याकडे काय प्रयोजन आहे काय ???
जीवनाच्या महामार्गावर चालताना मनाला सुरक्षित ठेवायचं असेल त्याला जखमी निराश हताश होऊ द्यायचं नसेल तर हे नियम पाळा प्रवास सुखकर होईल आणि इच्छित स्थळी सुखरूप पोहचाल .
🔷 विचारांचा आवेग कमी करा , क्रोध आडवा आला की लगेच शांतीचा हॉर्न द्या .
🔷 मोह आणि हव्यासाच्या पंपावर इंधन भरू नका .
🔷 मनाच्या अवाजवी ईच्छांवर संयम व अनुभवाच्या लोखंडाने बनलेलं हेल्मेट घाला .
🔷 विपश्यना ध्यान आणि आत्मचिंतन यांचा सिटबेल्ट लावा .
🔷 जगण्यात आलेला अति वेग ओळखा व वेळीच रस्ता पाहून वेगमर्यादा ठरवा विसरू नका ‘अति घाई संकटात न्हेई’ .
🔷 वयाच्या जीवघेण्या वळनांवरती जपून चाला नकारार्थी विचाराना सकारार्थी विचारांची लाईट द्या मग पुढे चला .
🔷 कोणाला ओव्हरटेक करण्याच्या भानगडीत पडू नका जीवनाचा मार्ग फार प्रशस्त आहे मत्सर, संकुचित वृत्ती आणि इर्षेने त्याला अरुंद करू नका .
🔷 कोणत्याही गोष्टीचा अहंकार जगण्यात बेहोशी आणतो तो पिऊन वाहन चालवू नका.. धडकाल !!
🔷 दिखाव्याची हायबीम(अप्पर लाईट) उगीच कोणाच्या डोळ्यावर मारू नका व स्वतःही डोळ्यावर घेऊ नका डोळे अंधारतील यासाठी ‘साधी राहणी ऊच्छ विचार’ कंपनीचा गॉगल वापरा .
🔷 वासना अश्लीलता आणि व्यभिचाराच्या नो एन्ट्रीत घुसू नका, न परवडणारा दंड भरावा लागेल
🔷 विकृती व्यसनकर आणि झटपट श्रीमंती चौकात थांबू नका सदाचारी शिक्का असलेलं लायसेन्स जप्त होईल .
🔷 तणाव आणि तो निर्माण करणाऱ्या कारणांपासून ‘सुरक्षित अंतर ठेवा’ .
🔷 निर्णयाची काच ब्रेन स्प्रे मारून पारदर्शक ठेवा .
🔷 ध्येयमार्गावर एकाग्रतेने चाला कारण लक्ष्यात ठेवा ‘नजर हटी दुर्घटना घटी’.
🔷 परमेश्वरावर विश्वास ठेवा योग्य वेळी तो तुम्हालाही देईल त्यामुळे ‘लेणची शिस्त पाळा’☺️ आणि बिनधास्त हे गाणं वाजवत पुढे चालत रहा = अपना टाईम आयेगा..!!
आणि हो हे करूनही अपघात झालाच तर तो प्रारब्धाचा भाग समजा याचा दोष तुम्ही स्वतःकडे घेऊ नका कारण केव्हा केव्हा आपली काही चुकी नसतानाही अपघात होऊ शकतो आणि तो झालाच तर जखमी मनाला समुपदेशनाची मलमपट्टी करा सांगळलेल्या भावनाना मित्रापाशी मोकळं करा तो मित्र तुमचा दोस्त असेल , तुमचे आई बाबा असतिल , भाऊ बहीण असतील , तुमची मैत्रीण असेल किंवा तुमचा नवरा,तुमची बायको असेल किंवा एखादा मानसोपचार तज्ञ असेल अशी कोणतीही व्यक्ति असु शकेल जी तुम्हाला ओळखते ज्यांना तूमची किंमत आहे, ज्यांना तुमची गरज आहे, ज्यांना जगताना तुम्ही सोबत हवे आहात जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यापाशी मन मोकळं करा ते तुम्हाला समजून घेतील तुमच्या दुखावल्या मनाला, आत्म्याला प्रेमाचा सहानुभूतीचा उपचार देतील, अडचणींना मार्ग देतील आणि म्हणतिल ‘तुझा पुढील प्रवास सुखाचा होवो’…!!!
लेखक : तात्या ननावरे .