BHOOMI KANYA / भूमी कन्या
त्यागूनिया सिंहासन,गाठलं त्यानं कानन।भार्या त्याची निष्कांचन,हवं झालं मृगकांचंन।रेषा भुलली लक्ष्मण,आनी झालं अवलक्षण।रावनाच्या मोहा पायी ,घडले ग रामायण।जाळुनीया लंका सारीमिळवली त्याने सीता।एका धोब्याच्या नादानजळली ती पतिव्रता।राम राज्य आलं तरीश्राप लागतो भोगन्या…
STHALANTAR / स्थलांतर
कुठून येते साद अनावर..मनुष्य असो वा कुणी जनावर..सुरवंट ते नव्या पाकोळ्या..जुन्याच वाटा जुन्या चाकोळ्या..वरवर वाटे भरकटलेला..प्रवास सारा पूर्वयोजिला…कुठे कोणती ओढी प्रेरणा.. जीवन त्यागून भोगी मरणा..शरीर थकता पांथस्थाचे..इथंच क्षणभर घेई ‘विसावा’..मशाल…
HOONKAR / हुंकार
पाखरांच्या थव्यासवे सांज उतरली धरी..तिचा अधीर अधर कातर थरथरी .श्वास उन उन होता ,पापण्या जडावल्या..गंधावल्या माती मध्ये सार्या मुरल्या सावल्या.दूर बासरीची धून,कानी पडे अनवट ..देह देहात वाजली एक मंद्र सुरावट.सार्या…
VEET / वीट
अगा ईठ्ठला काय हे जाहले ?नको ते पाहिले पंढरीत .तुझ्या दारी देवा नसे अडवणूकपोट निवडणूक चाललीया .दर्शना वाचुनी वारकरी तडफडंwar करी फडं कडाडला .तुझ्या वाळवंटी अश्वांचं रिंगानआश्वासनांचा धिंगाना करताती.तुका ज्ञानियाचा…
GHAZAL / गझल
छोट्या मुलीप्रमाणे वाटे परीच कविताझाली जरी कितीही मोठी बरीच कविता भन्नाट कल्पनांचे झाले कवी दिवाणेआता कुठे कुणाला येते खरीच कविता प्रेमात माझिया ती नक्कीच मुग्ध झालीओठावरी तिच्याही आली तरीच कविता…
GHAZAL / गझल
लागली बघ, झड पुन्हा आठवांची लड पुन्हा चिंब स्वप्ने पाहतेपापण्यांची कड पुन्हा ती पुन्हा आल्यावरीपावसा रे, पड पुन्हा का जुना रस्ता करीपावलांना जड पुन्हा अंतराने दूर जाअंतराशी जड पुन्हा राजपुत्राची…
GHAZAL / गझल
असे वाटते दूर जावे कुठेही मनासारखे पण जगावे कुठेही कशाला हवी दादही मैफलीचीमनाचे मुके गीत गावे कुठेही जरा प्रेम देताच लाडात येतेमनालाच फेकून द्यावे कुठेही कुठे माहिती जीवनाची नदी का,नको त्या…
SHABDAPRADHAN GAYAKI-GHAZAL / शब्दप्रधान गायकी – गझल
गझल हा अतिशय सुंदर असा काव्यप्रकार आहे. पूर्वी फक्त गायकीपुरता मानला जायचा. मात्र, एकाच वृत्तातील दोन-दोन ओळींच्या अनेक कवितांची ही गुंफण असते. वृत्ताबरोबरच ती ओळखली जाते – प्रत्येक शेरातल्या दुस-या…