नमस्कार मित्रांनो !
आज भाग क्रमांक नऊ रंगभूमीवर कितीही तीव्र स्वरुपाची भावना व्यक्त करायची असो ती सौम्यपणाने व्यक्त करावी उगाच जोरजोराने हातवारे करून त्या भावनेच्या चिंधड्या उडवल्यासारख करू नये .एकंदरीत अभिनयातील नाटकीपणा हा आता खूप मागे पडत चालला आहे अंगविक्षेपाचे कार्य शक्य तितके चेहऱ्यावरील अभिनयाने करण्याकडेच उत्तम नटाची प्रवृत्ती दिसते .नाट्य परिणामकारक होण्यासाठी ज्याप्रमाणे भाषणास अंगविक्षेप याची जोड द्यावी लागते त्याचप्रमाणे काही क्रिया व एक प्रक्रिया याचीही जोड देणं जरुरी असते .एकच प्याला या राम गणेश गडकरी यांच्या नाटकातील एक उदाहरण मी ऐकलं होतं चित्तरंजन कोल्हटकर यांनी तळीरामाची भूमिका केली होती नाटकातील एका प्रवेशात तळीराम सुधाकराच्या पायाशी बसून रामलाल व सिंधू यांच्यासंबंधी त्याचं मन कलुषित करत असतो आणि एकीकडे कोचावर बसलेल्या सुधाकराचे पाय चेपित असतो पाय चेपता चेपता दारुड्या तळीराम अनावधानाने सुधाकराच्या पायाजवळ असलेला सोफ्याचा पायच चेपू लागतो त्यामुळे प्रेक्षकांमधून हशा मिळतो हशा पिकतोच .या साध्या क्रियेमुळे तळीरामाचा व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला जातो .या क्रिया पेक्षा किंचित अधिक सूक्ष्म अशा काही उपक्रमांचेही अभिनयास जोड देणे इष्ट असते यास इंग्रजीत by-play म्हणतात.अभिनय करीत असताना काही क्रिया मनुष्य स्वाभाविकपणेच करत असतो तुम्ही पाहा अनुभवी नटांच्या या गोष्टी अंगवळणी पडलेल्या असतात . साधी सिगारेट किंवा विडी ओढण्याची क्रिया योग्य वेळेनुसार केली तरच ते अर्थपूर्ण आणि प्रभावी होऊ शकते .मित्रांनो आज मी तुम्हाला काही प्रसंगी कशाप्रकारे अंगविक्षेप व उपक्रम करायचा याचं प्रात्यक्षिक घरी करण्यासाठी विषय देतो. व्हिडिओ करा वाटल्यास व स्वतः बघूनच आपण काय चुका केल्या किती छान केलं ते ओळखा . १)तुमच्या डोक्यावर प्रहार करण्यासाठी एखाद्या व्यक्तीने काठी उगारली आहे व तुम्ही वाचवण्यासाठी प्रयत्न करतात .२)तुम्हाला मारण्याची धमकी देणार्या समोर “पाहू बरं ,मार कसा मारतोस ते “असं म्हणून तुम्ही धैर्याने उभे राहतात. ३)एखादी भयंकर बातमी अनपेक्षितपणे कानावर पडल्यामुळे तुम्ही कपाळाला हात लावून मटकन खाली बसतात. ४ )तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून तुम्ही त्यांना बसावयास सांगता.५)तुम्ही भीत भीत वाटेने जात असताना अचानक पाठीमागून “कोण आहे तिकडे” असे दरडावणीचे शब्द ऐकू येतात व तुम्ही अतिशय दचकता .या आणि अशा प्रकारच्या काही क्रिया तुम्ही घरी करा आणि स्वत ला बघा. आरशासमोर करा व्हिडिओ करा व बघा. तुमचा स्वत चा आत्मविश्वास खूप वाढेल. क्रमशः उद्या लेखाचा शेवटच्या भाग असेल. गुरुदत्त लाड
गुरुदत्त लाड