भाग-२ नमस्कार मित्रांनो कालपासून मी नाटक कलेविषयी लेखमाला लिहिण्याचं ठरवलं सुरूवातही केली पण भारतीय नाटकाची परंपरा कशी आहे याविषयी मी आज लिहीणार आहे. आपल्याकडे नाट्यास पाचवा वेद म्हटले आहे .चार वेदांपासून निरनिराळे गुण घेऊन ब्रम्हाने म्हणजे ब्रह्मदेवाने या पाचव्या वेदांची निर्मिती केली नाट्याची उत्पत्ती देवलोकी झाली असून त्याचं उत्पादकत्त्व श्रीशंकराकडे देण्यात आल आहे म्हणून श्रीशंकरास नटराज नटेश्वर महानट अशी नावं दिलेलीआढळतात.पाचवा वेद म्हणजे नाट्यवेद जबाबदारी ब्रम्हदेवाने भरताकडे दिली .म्हणून भरत हा भारतीय नाट्यशास्त्राचा जनक होय.परंतु पुरातन काळी नाट्य हे कोणत्यातरी धार्मिक विधीशी संबंध आहे असे म्हणतात देवानी असुरांवर मिळवलेल्या विजयानंतर इंद्रादि देवांचा गौरव करण्याच्या निमित्ताने ब्रह्मदेवाने त्या विषयावर नाटक बसवून त्याचा प्रयोग करविला. ही नाटकाची सुरुवात मानतात. भरताने लिहिलेला नाट्यशास्त्र हा पुरातन ग्रंथ नाटकातल्या कलावंतांसाठी आजच्या प्रायोगिक व्यावसायिक नाटकासाठी अनुकूल आहे . कारण रंगभूमीची मांडणी सजावट त्यासाठी लागणारी सामग्री नटांची निवड भाषण पध्दती इत्यादी नाट्यविषयक विविध बाबींचा तपशीलवार विचार केलेला आहे. नाट्यशास्त्रात अभिनयाचे आंगिक वाचिक सात्त्विक व आहार्य असे चार प्रकार मानले आहेत आंगिक अभिनयात नटाचे अंगविक्षेप उठणे बसणे चालणे इत्यादी क्रिया मुद्राभिनयात आवश्यक असलेल्या हालचाली याचा समावेश होतो.आवाजाचा चढउतार वाक्यात विशिष्ट ठिकाणी जोर देणे विराम pause इत्यादी. भाषण पध्दतीमधील बारकाव्यांचा विचार वाचिक अभिनयात केला आहे.अष्टरस त्याचे स्थायीभाव ते व्यक्त करण्याच्या पद्धती त्यांचा सात्त्विक अभिनयात समावेश केला आहे आहार्य या अभिनय प्रकारात नटाची वेशभूषा रंगभूषा याचा विचार केला आहे
क्रमशः गुरुदत्त लाड