नमस्कार मित्रांनो !
आज सहावा भाग गेल्या भागामध्ये ‘भावबंधन ‘या नाटकातले काही वाक्य तुम्हाला तुमच्या भाषण पद्धतीमध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने पाठवली होती .या भागात ‘भावबंधन’ ‘पुण्यप्रभाव’ ‘जग काय म्हणेल’ या नाटकातली काही वाक्य तुमच्या आभ्यासासाठी, तुमच्या भाषण पद्धतीमध्ये सुधारणा होण्यासाठी पाठवत आहे. ‘भावबंधन’ या नाटकातलं हे वाक्य एका दमात म्हणण्याचा अभ्यास तुम्ही केलात तर तुम्हाला खूप फायदा होईल “एखाद्या मत्सरी मनुष्याला। सूडाच्या त्वेषाने मारलेल्या दुबळ्या देहाच्या राखेवर बसून सैतानी समाधानाने हसताना काय तो या वृक्षांनी पाहिला असेल ” दुसरे उदाहरण __”परस्परांच्या अंगाला विळखा घालून अधरामृत पानात गढलेल्या जहरी जोडीतून ओढून काढलेल्या नागाचे चाबकाप्रमाणे फटकारे मारून खवळल्यामुळे फोफावणारी नागीण हातात धरून। तुझ्या हातातल्या हाराप्रमाणे मनगटाभोवती खेळवण्याचा मी चांगला सराव केला आहे ” पुण्यप्रभाव या नाटकातल्या या वाक्यांचे दोन खंड पाडता येतात व ते दोन्ही लांब आहेत परंतु ते एकेका दमात म्हणणं प्राप्त आहे .एका दमात म्हणून ती प्रेक्षकांना पण स्पष्ट ऐकू जावी यासाठी चांगला प्रयत्न करा . मित्रांनो प्रत्येक शब्दाची सर्व व्यंजने स्वच्छ उच्चारता यायला हवी आणि शेवटचे शब्द स्पष्ट ऐकू जातील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे .वाक्यातील शब्द व इतर भाग यातला वेगळेपणा प्रेक्षकांना कळावा यासाठी आवाजात तेवढ्यापुरताच चढ उतार करणं, कमी अधिक करणं गरजेचं आहे उदाहरणार्थ भावबंधन याच नाटकातल हे वाक्य “लतिके साठी मालती आणि मालती साठी धुंडिराज अशी ही दावण मला बांधावीच लागणार” ‘लतिका, मालती ,मालती, धुंडिराज’ या शब्दांवर जोर दिल्याशिवाय ‘दावण’ बांधल्याची कल्पना स्पष्ट होणार नाही.
क्रमशः गुरुदत्त लाड