• Mon. Dec 23rd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

NATYAKALA LEKHMALA / नाट्यकालेविषयी लेखमाला भाग ५

Bywachankatta

Apr 25, 2021

नमस्कार आज भाग पाचवा खणखणीत आवाजाबरोबर नटाची वाणी शब्द स्वच्छ नसेल तर प्रेक्षकांत त्यांचे भाषण ऐकू येईल परंतु नीट समजणार नाही पुष्कळ नट बोलताना फार घाई करतात काहीजण शब्दांचे उच्चार स्पष्ट करत नाहीत व काही नटांना तर सगळे वाक्य स्पष्ट उच्चारून वाक्याचे शेवटचे काही शब्द हलक्या आवाजात किंवा अस्पष्ट उच्चारायची सवय असते .हे बघा तुम्हाला रंगभूमीवर अभिनय करायला शिकायचंय तर मग हे दोष दूर केले पाहिजेत आणि अभ्यासाने दूर होण्यासारखे आहेत आपला जो जबडा आहे तो नीट उघडला नाही तर ‘आ’ हा वर्ण अ सारखा ऐकू येतो ‘पापापासून ‘हा शब्द पा$ प $पसून असा उच्चारला जातो .’दादाना’ हा शब्द द$ ना असा ऐकू येतो देवदर्शनासाठी चे देव$र्शनासाठी असे रूपांतर होते.नाटकातील संभाषणात स्वच्छपणा येण्यासाठी पुढील काही सूचना लक्षात ठेवा १)वाक्य उच्चारताना घाई करू नये घाईने उच्चारलेले वाक्य प्रेक्षकांच्या ध्यानात येत नाहीत वाक्य उच्चारण्याची गती कमी करणे याचा अर्थ प्रत्येक शब्द थांबून म्हणणे नव्हे तसे केले असता ते वाक्य कानाला गोड लागणार नाही. व त्यात कृत्रिमता येईल.२)वाक्य मोठे असले तर त्याचे लहान लहान खंड पाडून प्रत्येक खंडानंतर थोडा विराम घेत उच्चारावे म्हणजे नटस सोयीचं पडते आणि प्रेक्षकांसहि त्याचा आशय लक्षात येण्यास अडचण पडत नाही .मित्रांनो मी तुम्हाला अभ्यासासाठी पुण्यप्रभाव नाटकातील संभाषण पाठवतो .आज परमेश्वराने मला ऐन संकटात साहाय्य केले नाही । तर पृथ्वीवरचे प्रभुत्व संपवून । तिच्यावर कलिपुरुषाची प्रतिमा कल्पून । या हाराने तुमची पूजा करीन । आणि पापाची ग्वाही फिरवून । अट्टाहासाने ओरडून सांगेन । की जगात ईश्वराचे अस्तित्व नाही । आणि पातिव्रत्य हीच सुकलेल्या मुर्खाची बाष्कळ बडबड आहे” . सध्या पौराणिक मालिकांचे पीक आलेले आहे त्यामध्ये भूमिका मिळण्यासाठी अशा पध्दतीची वाक्य तयार करा भूमिका नक्की मिळेल

क्रमशः गुरुदत्त लाड

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !