नमस्कार मित्रांनो आज भाग चौथा नाट्यप्रयोग करणं हा एक सांघिक व सहकारी प्रयत्न आहे या भावनेनं पहिल्यापासून शेवटपर्यंत तालमी करायला पाहिजेत तालमीच्या वेळी निष्काळजीपणा करु नये मनापासून अभिनय न करणे विशिष्ट प्रकारचा अभिनय मी आयत्या वेळी करीन अशी वृत्ती ठेवणे आपल्या बरोबरच्या कलाकारा ला रिस्पॉन्स न देणे या गोष्टी केवळ अक्षम्य आहेत. परस्पर सहकार्याने तालमी केल्या असता नाटक चांगलं बसतं.लवकर बसत. आज मी तुम्हांला भाषण पध्दती या विषयावर सांगणार आहे खणखणीत आवाज व स्वच्छ वाणी हे नटाच्या अंगी आवश्यक असलेले महत्त्वाचे गुण आहेत काही नटांचा आवाज कोता किंवा घोगरा असतो त्यामुळे त्यांचं भाषण प्रेक्षकगृहात सर्वत्र ऐकू जात नाही पण अभ्यास करून आपल्या आवाजात आपण सुधारणा करू शकतो .तर आज भाषण पद्धतीमध्ये म्हणजे नाट्यशास्त्रात ज्याला पाठ्य गुण म्हणतात इंग्रजीत त्याला speech / delivery म्हणतात .म्हणजे मित्रांनो नाटककाराने लिहिलेलं वाक्याचा आशय असतो त्यातलं मर्म प्रेक्षकांच्या मनावर ठसणं त्याला उत्कृष्ट भाषण पध्दतीचं लक्षण म्हटलं जातं . उदाहरणादाखल’ तू फार शहाणा आहेस’ या वाक्याचा सरळ अर्थ किंवा त्याच्या उलट उपरोधात्मक लाक्षणिक अर्थ प्रेक्षकांच्या मनावर ठसविणे प्रत्येक नटाच्या वाक्य उच्चारण्याच्या पध्दतींवर अवलंबून राहील मनुष्याच्या आवाजात फार मोठं सामर्थ्य आहे आवाजाला ईष्ट ते वळण देऊन त्याद्वारे मनुष्याला विविध आशयाची अभिव्यक्ती करता येते .दुसरं उदाहरण ”तू हे काय केलेस?” या एकाच वाक्यात साधे कुतूहल, क्रोध, करुणा ,आश्चर्य इत्यादी विविध भावना संदर्भास आनुसरून व्यक्त करता येतात. कित्येकवेळा वाक्यातील शब्द हेतूपूर्वक विशिष्ट क्रमाने घातलेले असतात तो क्रम बदलला तरी वाक्याचा आशय बदलण्याचा संभव असतो. मित्रांनो आज ही दोन उदाहरणं तुम्ही स्वतः करून बघा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि जमल्यास तुमच्या आवाजातील रेकॉर्डिंग माझ्या ई-मेल ला पाठवू शकता
गुरुदत्त लाड