नमस्कार आज भाग तिसरा स्टँनिस्लाव्हस्की च्या तंत्राचा थोडा अधिक विचार करू रंगभूमीवरील काल्पनिक सृष्टी ही सत्यच आहे असं समजून त्या सृष्टीत वावरत असता विशिष्ट प्रसंग प्राप्त झाला तर मनुष्य काय करील कसा वागेल या विशेष सतत चिंतन करीत राहण्याचे मनाला वळण लावले असता त्या सृष्टीशी समरस होणे साध्य होते व नटाची कल्पना शक्ती जागृत होते नाटककार कथावस्तु निर्माण करतो निरनिराळ्या पात्रांचा स्वभाव विकास दाखवितो परंतु नाट्यरूपाने त्याचा आविष्कार नट करीत असतो शब्द हे नाटककाराचे माध्यम असते तर अभिनय हे नटाचं माध्यम असते नाटककाराने आपल्यापरीने नाट्य दृष्ट्या महत्त्वाच्या कितीही रंगसूचना Stage directions घातल्या तरी नाटककाराने निर्माण केलेल्या स्वभाव चित्रणास उठाव देणारे रंग आपल्या कल्पनाशक्तीने भरण्याचे कार्य नटाने करावयाचे आहे ते केले नाही तर ते स्वभावचित्र फिके पडते व एकप्रकारे नटाने लेखकास अन्याय केल्यासारखे हाेते अभिनयात स्वाभाविकता व सहजता आणण्यासाठी नटाने आपल्या शरीरातील निरनिराळ्या स्नायूंवर ताबा मिळवणं आवश्यक आहे सामान्यतः रंगभूमीवर वावरत असताना नटाच्या मनाला एकसारखा ताण बसलेला असतो कितीही अनुभवी नट असला तरी हजारो प्रेक्षकांसमोर आल्यानंतर त्याच्या मनाला थोडीतरी अस्वस्थता वाटल्याशिवाय राहत नाही नऊशिखा नटाचं तर हे फारच अनुभवास येते. रोजच्या व्यवहारात तो निरनिराळ्या हालचाली व क्रिया जितक्या सहजतेने करीत असतो तितक्या सहजतेने रंगभूमीवर वावरणे त्याच शक्य होत नाही यासाठी शरीरातील स्नायू सैल व मोकळे सोडण्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे स्नायू सैल सोडल्याने बसणे उठणे चालणे इत्यादी क्रियेमध्ये सहजता उत्पन्न होते रंगभूमीवर आरामशीर बसण्याची साधी क्रिया ही सामान्य नटास साधत नाही याचे कारण हेच की रंगभूमीवर वावरत असताना त्याचे स्नायू एकसारखे ताणलेले राहतात . कसलेल्या नटाची प्रत्येक हालचालीत सहजता दिसते ती त्याने स्नायूंवर ताबा मिळविलेला असतो त्यामुळेच स्टँनिस्लाव्हस्की याची निरनिराळ्या भूमिकेतील छायाचित्र पाहिली तर त्याने हे स्नायू नियंत्रणाचे तंत्र कसं आत्मसात केलं होतं याची कल्पना येते अशा श्रेष्ठ नटाची छायाचित्र आजच्या तरुण मुलांनी पाहणे हे एक प्रकारचे शिक्षणच आहे क्रमशः