• Mon. Dec 23rd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

NATYAKALA LEKHMALA / नाट्यकला लेखमाला भाग ८

नमस्कार !

आज भाग आठवा मित्रांनो रंगभूमीवर नाटकात भूमिका करताना बसणं ,उठण ,चालणं, पडणं इत्यादी निरनिराळ्या हालचाली किंवा क्रिया कराव्या लागतात . रंगभूमीवर उभ राहण्याची किंवा चालण्याची ढब कशी असावी ऐटबाज पणा कसा आणावा यासंबंधी आपण थोडा विचार करू या गोष्टींचं शब्दांत वर्णन करून सांगणं कठीण आहे पण हा गुण काही माणसात स्वभावातच असतो नटाच्या अंगी हा गुण मुळच्याच असावा लागतो .यासाठी व्यायामाचे प्रकार करणे आवश्यक आहे. व्यायामाने मनुष्याचे शरीर लवचिक बनते आणि हालचालीत एक प्रकारची आकर्षकता निर्माण होते .काही लोकांना पोक काढून उभं राहण्याची किंवा बसण्याची सवय असते .हा दोष व्यायामानं दूर करता येण्यासारखा आहे काही लोकांची पावलं चालताना जड पडतात. नवीन अभिनेते काम करणारे होतकरू नटाने व्यायाम करणं फार आवश्यक आहे उभ राहण्यात बसण्यात चालण्यात स्वाभाविकपणा तर दिसावयास पाहिजे. परंतु गबाळेपणा दिसता कामा नये . रंगभूमीवरील नाटकाकडे प्रेक्षक चिकित्सक दृष्टीने पाहत असत त्यामुळे नटाकडे तरतरीतपणाही असायला हवा काही लोक साधे खुर्चीवर बसतात तेही पाठीचा कणा मोडून खुर्चीत अंगाचे गाठोडे करून टाकल्यासारखा बसतात रंगभूमी वर तसं करून चालणार नाही अर्थात पात्राच्या स्वभावातच तसे दाखवले असेल तर गोष्ट वेगळी.खुर्ची मध्ये बसताना दोन्ही खांद्याचे पृष्ठभाग व कण्याचा खालचा भाग खुर्चीच्या पाठीला टेकले गेले पाहिजे सहजता येण्यासाठी पायावर पाय टाकून बसल्यास बरे दिसते.स्त्रियांनीसुद्धा बसताना दोन्ही पाय खाली मोकळे सोडून घोटय़ाजवळ एकमेकांत अडकवून बसलेले बरे .उभे राहताना किंवा चालताना सामान्यतः शरीर व विशेषतः मान सरळ ठेवून चालावं याचाही अभ्यास करणं आवश्यक आहे मान ताठ ठेवताना तारतम्य ठेवणे महत्त्वाचे .प्रथम एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवायची ती अशी की रंगभूमीवरील कोणतीही हालचाल विशिष्ट हेतूने व्हायला पाहिजे प्रत्येक हालचाल त्या त्या प्रसंगास अनुसरुन झाली पाहिजे .उदाहरणार्थ काही विशिष्ट हालचाली माणसाच्या मनाची विशिष्ट अवस्था दर्शविण्यासाठी केल्या जातात मन अस्वस्थ असता बसलेला मनुष्य उठून उभा राहतो किंवा येरझारा घालू लागतो.अस्वस्थ मन शांत झाले की येरझारा घालणारा मनुष्य खाली बसतो हताश झाला असताना मनुष्य मटकन खाली बसतो .तात्पर्य प्रत्येक हालचालीत मनुष्याच्या मनाचे प्रतिबिंब उमटले पाहिजे .

क्रमशः गुरुदत्त लाड

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !