सावरून ठेवलेल्या जीवनाची विस्कटून जाते घडी,
शहाण्यासारख्या मनाशी खेळते, एक अपेक्षा वेडी..
हिला मुळी नसतच कधी जगाच भान,
जोरजोरात गात राहते नुसते आपलेच तान..
इथलं सगळचं आहे फसव, माहत आहे हिला,
तरी किनाऱ्यावर बांधत राही वाळूचा किल्ला..
एकच येईल लाट आणि सगळच जाईल वाहून,
डोळे भरून त्याच्याकडे बघायचंही जाईल राहून..
तरीही पुन्हा तीच अपेक्षा, तेच वाळूचे किल्ले,
कानांवरून अलगद निसटनारे जगाचे फुकटचे सल्ले..
कधीतरी येईलच या समुद्राला ओहोटी,
वेड्या अपेक्षेला हीच अपेक्षा खोटी..
- किर्ती हवालदार
- kirti22hawaldar@gmail.com