केला शिक्षण प्रसार, जगी ठरले भगीरथी
गरिबांच्या जीवनात,आली शिक्षणाची गती
निर्मिली शिक्षण संस्था, ठरले खरे कर्मवीर
थोर भाऊरावांच्या चरणी, मी टेकवितो शीर
विद्यार्थी दशेतच झाले, समाजसेवेचे संस्कार
गरीब विद्यार्थ्यांच्या, जीवनास दिला आकार
शिक्षण घेण्या विद्यार्थ्यांना, दिला त्यांनी धीर
निर्मिली शिक्षण संस्था, ठरले खरे कर्मवीर…
वसतिगृह काढले, त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी
होता स्मरण कर्मवीरांचे, पापण्यांत होते दाटी
निःस्वार्थ सेवा कर्माचे, ते होते थोर फकीर
निर्मिली शिक्षण संस्था, ठरले खरे कर्मवीर…
फुले, शाहू विचारांचे, खरे ठरले अनुयायी
महाराष्ट्राची धरणीमाय, गीत तयांचे गाई
गोरगरीब जनतेची,होती सदा त्यांना फिकीर
निर्मिली शिक्षण संस्था, ठरले खरे कर्मवीर…
–लीलाधर दवंडे
कामठी ( नागपूर )