तो निवांत बसुनी, पाय पसरूनी,
घेत घोट चहाचे,
जगण्याचे पुस्तक वाचे..
उलटतो जसजसे पान,
येतसे जाण ही, सुखदुःखाची..
तो हसून केवळ, म्हणे बुडबुडे,
यास ना, सर त्या खोल जळाची..
लागली ठेच जी एक जिव्हारी,
ती गात नसे रडगाणे,
ती शिकवून जाते रोज नव्याने,
हसण्याचे लाख बहाणे..
तो मिटून डोळे आणि शिरतो,
खोल खोल तळाशी,
भेटतो क्षणभर, जपतो नाते,
आज ही त्या जखमेशी..
– किर्ती हवालदार
kirti22hawaldar@gmail.com