वाढ होते आदराची आदराने
होत नाही फार तोटा वाकल्याने
शेवटी मी ही लढाया सज्ज झालो
शक्य नाही फक्त जगणे सोसल्याने
पाहिजे ती शब्दशैली वेधण्याची
कोण झाला थोर कविता चोरल्याने
गोडबोली खाद्य थोडे लागते रे
होत नसते भूक मित्रा जेवल्याने
मान्य आहे मीच हरलो कैकदा पण
हर्ष तुज झालाच नाही जिंकल्याने
प्रविण जगन्नाथ बोपुलकर
खेट्री, जि. अकोला