मनाच्या पाटीवर काही धूसर स्वप्ने, पुन्हा गिरवण्याचा अट्टाहास,
जमिनीवर फडफडणाऱ्या पंखाना आकाशाचा लागला ध्यास..
माझे म्हणावे असे नव्हतेच काही हाती,
आधार पावलांना देण्यास फक्त माती..
आशेच्या मनोऱ्याचे भग्न काही अवशेष,
पुन्हा पुन्हा डिवचणारे जुनेच काही क्लेश..
जरी वाटे कोणाला, उरला आहे फक्त श्वास,
पण त्याहूनही अनमोल असा आहे एक विश्वास..
ना पसरतील कधी कोणापुढे हे हात,
वळलेली मुठ माझी करेल साऱ्यावर मात..
दृढ निश्चयाचे साचे साकारती मनाला,
घेईन एक झोका, भेदिल आकाशाला..
- किर्ती हवालदार
- kirti22hawaldar@gmail.com