घर म्हणाल किती दिवस मी असं राहू
मला पण बदल हवाय मी किती वाट पाहू
करोनमुळे तुमचं आयुष्य बदललं
पण मी मात्र तेच तेच आयुष्य जगलं
घर म्हणाल कर मला रिनोवेट
मी म्हटलं धीर धर थांब जरा कर वेट
घर म्हणाल नवीन रंगात मला चमकू दे
माझ्या या नवीन रूपात तू मला साथ दे
घर म्हणाल कर नवीन फर्निचर
आयुष्यात कस असेल माझं फ्युचर
घर म्हणाल कसा दिसेल माझा नवीन गेटप
बिझी आहे शांत राहा बघतेय मी व्हाट्सअप
सुरुची वीरकर