• Tue. Dec 24th, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

FORMALITY/फॉर्म्यालीटी

प्रिय मित्रा….

कधीतरी आठवण काढत जा,
मनाला फार बरं वाटतं..
असलं जरी वरवरचं प्रेम
पण तितक्यापुरतं खरं वाटतं…

मी सुद्धा उगाच हसून
तुझ्या उत्तरांना प्रतिसाद देईल
सुकलेल्या नात्यांच्या झुडपाला
तेवढ्यापुरती हिरवळ येईल

माहीत आहे कधीच नाही
येणार आपण भेटायला
आलो की भेटू म्हणून सांग
बरे वाटते ऐकायला

आता आयुष्य आहेच किती?
तेवढे दिवस असेच ढकलत नेऊ
जिवंत आहे मैत्री आपली
असच लोकांना दाखवत जाऊ

जवळीक साधत आहे
म्हणून भीती मनातली काढ
पैसे वगैरे मागणार नाही
मित्रा,फक्त आपल्यासारखा वाग

खोटे बोल, फुशारक्या मार,
पण आपल्यांसोबत बोलत जा
मैत्रीतली शेवटची फॉर्म्यालीटी
शक्य तितकी पाळत जा…

प्रविण जगन्नाथ बोपुलकर
खेट्री, जि. अकोला

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !