दूर कुठेतरी लागली होती आग, झळ मलाही पोचली होती,
पण डोळे झाकून पुढे चालत राहिलो, पांघरून दयेची चादर खोटी..
मी काही फार मोठा नाही, आग विझवायला,
शिवाय माझ्या घराची चिंता आहेच कि माझे हात झिजवायला..
माणूस आहे मी, मलाही आहे कळकळ,
पण दुसर काय करू शकतो, मी शिवाय एक हळहळ..
म्हणूनच चाललो आहे मी बंद करून हळव्या मनाच दार,
इथल्या आगीचा मी एक आंधळा साक्षीदार..
पण माहित नव्हत एक दिवस ही माझ्या घरात येऊन पोहचेल,
आणि काल मिटलेल्या डोळ्यात माझ्या आज पश्चाताप साचेल..
- किर्ती हवालदार
- kirti22hawaldar@gmail.com