अगा ईठ्ठला काय हे जाहले ?
नको ते पाहिले पंढरीत .
तुझ्या दारी देवा नसे अडवणूक
पोट निवडणूक चाललीया .
दर्शना वाचुनी वारकरी तडफडं
war करी फडं कडाडला .
तुझ्या वाळवंटी अश्वांचं रिंगान
आश्वासनांचा धिंगाना करताती.
तुका ज्ञानियाचा घडे जिथं घोष
‘सत्ता कार्यक्रम’ शोष पडला रे .
आषाढी कार्तिकी मुखदर्शना पाबंदी ‘
मुख पट्टी विना गर्दी ओसंडली.
कानडा रे राजा..सारे झाले बेलगाम
रणभूमी बेळग्राम झालीयसे .
हातावर पोट ज्याचं झालाय कंगाल
पोटावर हात बंगालात .
तिथं गंगा तटी तुडुंब मेळा भरे
मर्कज घेतील गळा भेटी.
वीट आला राया पाहुनी नंगा नाच
सोड आता वीट वाचव रे ..सोड आता वीट वाचव रे!
राजेश देशपांडे
rjsh.deshpande@gmail.com