पाखरांच्या थव्यासवे सांज उतरली धरी..
तिचा अधीर अधर कातर थरथरी .
श्वास उन उन होता ,पापण्या जडावल्या..
गंधावल्या माती मध्ये सार्या मुरल्या सावल्या.
दूर बासरीची धून,कानी पडे अनवट ..
देह देहात वाजली एक मंद्र सुरावट.
सार्या आसमंती उरे आता निळाईचा श्याम..
रक्तीमेत पाझरला धुंद निलाजरा काम.
भय..सय ना उरली,नाउरे लाज थोडी..
पुराव्याला फांदीवरी एक पारव्याची जोडी.
आला “उत्कट हुंकार”..शहारला तो पारवा…
तप्त वादळा नंतर ..आला..थकव गारवा…
राजेश चंद्रकांत देशपांडे
rjsh.deshpande@gmail.com