कुठून येते साद अनावर..मनुष्य असो वा कुणी जनावर..
सुरवंट ते नव्या पाकोळ्या..जुन्याच वाटा जुन्या चाकोळ्या..
वरवर वाटे भरकटलेला..प्रवास सारा पूर्वयोजिला…
कुठे कोणती ओढी प्रेरणा.. जीवन त्यागून भोगी मरणा..
शरीर थकता पांथस्थाचे..इथंच क्षणभर घेई ‘विसावा’..
मशाल आत्मा ईप्सित गावा..नवा भिडू तो नेत असावा..
राजेश देशपांडे
rjsh.deshpande@gmail.com