संन्यस्त डोंगराच्या पायथ्याखालून
गात जातोय
कुणी एक फ़क़ीर..
आर्त सूरांनी
भवताल व्यापून जाते
अवकाशालाही भेदून जातो
फकीराचा कातर स्वर
युगायुगांची विरहवेदना
अथांग भविष्याच्या
पटावर
सर्पछायेसारखी
सरसरून
पसरत असल्यागत…
आणि
जणू
अश्वत्थाम्याने
जीवाच्या आकांताने
दिलेल्या शापागत….
श्रीनिवास नार्वेकर© (२०१५)