• Mon. Dec 23rd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

KISSE / किस्से…

किस्से…
निसटतात..
असेच…
मध्येच…
हरवल्यागत…
अचानक…
कहाण्याही जातात संपून,
अश्याच
अर्ध्या वाटेवर…
हरवून जातात गाणी
तालासुरांत म्हटलेली,
विस्कटून जातात पार
भावविभोर गजला,
कधीकाळी हृदयातून उमटलेल्या…
गंमत म्हणजे,
एक वेडा असतोच असतो,
अशा किश्श्यांत…
सांडलेला असतो कुठेतरी
त्याचा एकच अश्रू,
कुठल्या तरी
एकाद्या अनाहूत क्षणी…
शोधत राहतो जन्मभर
तो वेडा,
आपला सांडलेला अश्रू…
डोक्यावरली जखम,
जखमेचा कराल शाप
माथ्यावर वागवणार्‍या
आणि
तेल मागत
रानोमाळ भटकणार्‍या,
भळभळत्या अश्‍वत्थाम्यासारखा…
काळाकुट्ट मिट्ट अंधार,
अमावास्येचा…

अरे,
मग हे चांदणं कुठून उगवलं ?
अमावास्येच्या अंधारात ?
असं…
अचानक…?

श्रीनिवास नार्वेकर©

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !