• Tue. Dec 24th, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

ARTHIK GULAMGIRI / आर्थिक गुलामी अटळ

आधुनिक भारताच्या स्वतंत्र नागरिकांनो तयार रहा परत एकदा गुलामीत जाण्यासाठी आर्थिक गुलामी अटळ

वेळ आहे क्रांतीची
सोशल मीडिया फक्त खोटी खुशहाली व मोठेपणा मिरवण्यासाठी नको …. प्रत्येकाच्या जीवनाचा प्रशस्थ मार्ग कशा पद्धतीने हळूहळू सिमीत आणि आखूड होत चालला आहे, प्रगती करताना व्यवस्थेचा कसा त्रास होतो आहे, प्रत्येक दिवशी केले जाणारे नवीन कायदे व नियम कसे त्रासदायक आहेत त्यातल्या तुम्हा आम्हाला दिसणाऱ्या उणिवा, शिक्षणव्यवस्थेपासून शेतीव्यवस्थेपर्यंतच्या त्रुटी कष्टाचे दोन घास कमवतानाही होणारा प्रचंड संघर्ष, वरवर मस्त वाटणारी भ्रष्ट जीवनशैली, जीवनमूल्यांचा अभाव, बिघडलेले मानसिक शारीरिक स्वास्थ्य, कष्टकऱ्यांच्या जिव्हावर उठलेल खाजगीकरण, कामाचे वाढते तास, घामाच्या कमाईवर इमाने इतबारे जगणाऱ्या चतुर्थश्रेणी कामगारांच होणार शोषण, होणारी अवहेलना एक ना अनेक यक्षप्रश्नांनी घेरलेलं मन , जातीवाद प्रांतवाद भाषावाद धर्मवाद श्रीमंतगरीब या भेदाभेदाच्या राक्षसांना पोसणारी वरच्या फळीतली असुरी प्रवृत्ती .
tv, इंटरनेट,जाहिरात चित्रपट व उपलब्ध सोशल मीडिया संसाधनांचा मानवी मन विकृत वासनाधीन व मूल्यभ्रष्ट करण्यासाठी केला जाणारा शर्थीचा प्रयत्न , आर्टिफिसीएल इंटेलिजन्सचा उघडलेला तिसरा डोळा या आणि अशा वास्तविक विषयांवरती आपण बोलायला हवं आपलं परखड मत व्यक्त करण्यासाठी ही काही मोजकी व्यासपीठ आहेत जिथे आपण आपले विचार मांडू शकतो यासाठीच फेसबुक इंस्टा ट्विटर सारख्या ऍप्सचा वापर करायला हवा कारण लवकरच ती देखील बंद पडतील , निव्वळ बडेजावकिच प्रदर्शन करून करून हातातली संधी दवडू नका नंतर पश्चाताप करावा लागेल .
कारण आत्ता ‘वेळ आहे क्रांतीची’ तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या सुरक्षित भविष्यकाळासाठी खर वास्तव समोर आणण्याची, तेही बेधडकपणे …!!
माझ्या मताशी सहमत असाल तर कोणाच्या सोबत येण्याची वाट पाहू नका सुरुवात स्वतः पासून करा आपल्या पुढच्या पिढीच्या सार्वत्रिक आनंदी भवितव्यासाठी आज आपल्यालाच उभं राहण्याची गरज आहे , कोणत्याही राजकीय व्यवस्था आणि नेत्यांकडून कसलीही अपेक्षा न ठेवता , कारण रात्रच नाही दिवसही वैऱ्याचे आहेत, खोट्या प्रसिद्धीला भाळू नका , जे खर आहे त्याच्याच बाजूने उभे रहा ते करताना परमेश्वराणे तुम्हाला दिलेल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करा , मीडिया बातम्या इंटरनेट वर दाखवली जाणारी प्रत्येक गोष्ट खरी नाही , खर तेच आहे जे तुम्ही आणि तुंमचे प्रियजन अनुभवत आहेत अवतीभोवती घडताना प्रत्यक्ष पहात आहेत, जीवनाला आलेल्या अनावश्यक वेगाच्या रथाचे घोडे होऊ नका .
जागे व्हा काळ तयार आहे तलवार घेऊन वेळ अजूनही गेली नाही संपायच नसेल तर किमान हातात एकी आणि क्रांतीची ढाल तरी धरा .परमेश्वराची सर्वात सुंदर निर्मिती आहे माणूस त्या माणसातील माणूसपण गिळायचा घाट काळाने घातला आहे तो ओळखा .
कोरोना सारख्या महामारी अजूनही येणार आहेत , जगणं अजूनही खडतर होणार आहे , मानस अजूनच कठोर होणार आहेत, व्यवस्था अजूनच भ्रष्ट होणार आहे, पैसा अजूनच महाग होणार आहे, एवढा की मी मी म्हणणाऱ्या श्रीमंतांची श्रीमंती क्षणात मातीमोल होणार आहे विशेषतः सोन,उंचीकपडे घालून महागड्या पत्र्यांच्या डब्यात मिरवणाऱ्या नवश्रीमंतांची , स्थावर मालमत्ता सोने शेयर्स यांच्या किमती कमालवरून किमाणवर येणार आहेत,निसर्ग अजूनच कोपणार आहे , निवडीच्या अधिकारा वरती अजूनच गदा येणार आहे, व्यक्तिस्वातंत्र्य , संचारस्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र, उत्पादन स्वातंत्र्य, मनोरंजन स्वातंत्र्य, लिखानस्वातंत्र्य,या सर्वांवरील निर्बंध अजूनच वाढत जाणार आहेत , काही तासांसाठी जाणारी वीज काही दिवसांसाठी जाणार आहे, माणूस माणसाला भेटण्यासाठी अजूनच तरसणार आहे,गरीब कमजोरांवरचे अत्याचार अजूनच वाढणार आहेत, खाजगी करणाची खरूज तुमची रात्रीची झोप उडवणार आहे , माजलेले भांडवलदार तुमच्या भविष्यकाळाची बोली लावणार आहेत , तुमच्या निवड स्वातंत्र्यावर निर्बंधाच ओझं वाढतच जाणार आहे ,मोबाईलशिवाय जगण्याची सवय लाऊन घ्या तो न वापरताही कस एकत्र राहता येईल यासाठी प्रयत्नशील रहा …!!
विश्वास ठेवा आणि एकत्र येऊन मुठी आवळा , सदाचार… सेवा… संयम… करुणा… त्याग… दानत…शौर्य या अंतर्मनातील मूलभूत गुणांना जागृत करा व त्यांचा अंगीकार करा सत्याच्या बाजूने उभे राहण्याची हिम्मत दाखवा यातच आपले हित आहे . रंगीत चकचकीत पॅकिंगमधल्या तकलादू गोष्टींचं अंधानुकरण टाळा..’भौतिक सुखाच्या आशेने विकले जाऊ नका, कष्ट करा काटकसरीने जगा, आदर्श व खरी जीवनपद्धती अंगीकारा व केवळ अशा पद्धतीने जगणाऱ्यांनाच मान द्या’ आपली प्रतिभा व प्रतिमा सुसंगत सुसंगत करण्याचा प्रयत्न करूयात बाकी जिंदगीमे क्या रखा है खावो पियो ऐश करो म्हणणाऱ्यापासून ‘तोबा’ करा कारण त्या आत्म्यांच पार्सल चुकुन मानवी शरीरात पोचलं आहे ‘खावो पियो ऐश करो’ या उक्तीला शोभणारे मोकाट जीव आपल्याला शहरांच्या उकिरड्यावर पहायला भेटतात त्या शरीरांना आपण ‘गाढव’ म्हणतो ज्यांचा एकमेकाला लाथा मारत दिवसभर खावो पियो ऐश करो हाच कार्यक्रम चालू असतो त्यामुळे अशा जिवांपासून दोन हात चार पाउल लांबच रहा .
जे खर आहे तेच स्वीकार करा मग ते समाजमान्य का नसेना ‘विसरू नका इतिहास मानवजातीचा,अंतिम विजय सत्याचा’ परमेश्वर सत्याच्या बाजूनेच उभा राहतो … !!! ..क्रमशः
लेखन माझ्या छोट्याशा जीवनातील स्वानुभवावरून
पटल्यास शेअर करून एकी व जागृती वाढवूयात
लेखक
तात्या ननावरे .

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !