स्तब्ध झाल्या भावना
शांत झाली लेखणी
ढवळलेल्या मनात
उद्रेकी झाली पेरणी
नव्हतेच कधी तिच्या
पिंडी रोषाचे निखारे
हटकून खेळी डाव
पुण्यवानं खेळणारे
अलिप्तं होती कोशात
निभावत सारे नाते
गफलित झाले हल्ले
सांत्वनी जे पूल होते
इतिहास ग्वाही देतो
वाल्याचा वाल्मिकी होते
पण वेळ आज आली
वाल्मिकी वाल्या होते
सौ. शितल राऊत
अमरावती