गोष्ट संपलीच आहे, पुन्हा पान उलटू नको..
शेवट झाल्यानंतर पुन्हा शेवट शोधू नको !!
एकदा संपली कि काहीच नसत हिच्यात..
तीच गोष्ट पुन्हा घडते पण नवीन साच्यात !!
धीर धर होईलच एक नवीन सुरुवात..
नवीन गोष्टीला मिळेल नवीन पात्रांची साथ !!
आता मात्र सगळच आहे एकट्या तुझ्या हाती..
कस लाऊन पिकवू शकतो तूच तुझी माती !!
कोसळतील जेव्हा तुझ्या कष्टांच्या असंख्य सरी..
तेव्हाच होईल गोष्ट अगदी तुझ्या मनासारखी खरी !!
- किर्ती हवालदार
- kirti22hawaldar@gmail.com