माझ्यात बाप आता बघतो बरेचदा मी
समजावण्या स्वतःला धजतो बरेचदा मी
केले जरी वजा तू अमुच्यातुनी स्वतःला
गणतीत मात्र तुजला धरतो बरेचदा मी
गेला कुठे अचानक आवाज ओळखीचा
गल्लीत त्या घरोघर बघतो बरेचदा मी
होऊ नयेत ओले डोळे तुझे कधीही
इच्छा नसून माझी हसतो बरेचदा मी
जेव्हा कुणीच नसते सांभाळण्या मनाला
विश्वात मी गझलच्या रमतो बरेचदा मी
प्रविण जगन्नाथ बोपुलकर
खेट्री, जि. अकोला