• Sun. Dec 22nd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

SRUJANATWA DYA DYA ARYATA | सृजनत्व द्या द्या आर्यता….

Bywachankatta

Jul 23, 2021
srujan

“NOT FAILURE BUT LOW AIM IS CRIME” हे अमेरिकन कवी जेम्स रसेल लोवेल चं वाक्य माझ्या मनात पक्कं ठसलंय. अपयश हा गुन्हा नाही तर खुजी स्वप्नं बघणं हा गुन्हा आहे.पण अर्थात स्वप्नं बघताना स्वतःचा वकूब जाणायला हवा.नाहीतर फक्त वैफल्यच ते.म्हणजे काहीजण आपल्या बौद्धिक आणि शारीरिक कुवती पेक्षा जास्त ओझं उचलायला जातात आणि आयुष्य लचकवून घेतात तर काही आपल्या पल्ल्या पेक्षा बारक्या पैलूवानाला  धूळ चारून विजयाचे चषक मिरवत राहतात.आणि हे दोन्ही गंड समूळ काढून टाकण्या साठीच सृजन द क्रिएशन चं मिशन आहे.

आपण अनेकदा साधनांनाच साध्य समजून स्वतःची फसगत करून घेतो.भौतिक वैभव हे साधन आहे साध्य नाही हे जाणवे तोवर जाण्याची वेळ येते.आपल्या मृत्यू नंतर ह्या जगात आपण काय ठेवून जाणार आहोत ह्याचं भान लवकर आलं तर माणसाला क्षुद्र दुःखांचा त्रास होत नाही आणि भोंगळ सुखांचा माज येत नाही.आणि कलावंतांनी तर आपल्या वैयक्तिक सुख दु:खांपासून त्वरित परे होऊन त्यांच्या कडे त्रयस्थपणे बघायला हवं आणि त्यांच्या कलाकृती करायला हव्यात.

सृजन परिवार त्रैमासिक अंक २ पूर्ण वाचण्याकरिता इथे क्लिक करा !

आपल्यावर येणाऱ्या संकटांकडे सकारात्मक दृष्टीने बघायला हवं. “ चला उभारू उंच शिडे ती गर्वाने वरती , कथा त्या खुळ्या सागराला , अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा , किनारा तुला पामराला” ह्या कोलंबसाचं गर्व गीत मधल्या कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या ओळी म्हणजे उर्जेचा स्त्रोत आहे.आणि तुकोबांनी तर खूप महान SECRET अत्यंत सोप्प्या शब्दात सांगितलंय “ मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण”. पावलो कोएलो त्याच्या अल्केमिस्ट मध्ये म्हणतो “ AND YOU WANT SOMETHING , ALL THE UNIVERSE CONSPIRES IN HELPING YOU TO ACHIEVE IT”.. तीव्र इच्छा शक्तीवर माझा विश्वास आहे. फक्त आपल्याला काय मिळवायचं आहे हे मात्र मनात पक्कं हवं. मला माझ्या साठी काही हवंय कि आपल्या साठी हवंय? मी , माझं, मला हाच विचार करणारे संकुचित आत्मे कितीही लाभलं तरी दुर्मुखलेले कष्टीच राहतात..उनके जीवन की कश्ती दुख कि नैय्या कभी पार नही कर सकती.

तेव्हा आपल्या आयुष्याला द्वेष मत्सरादी शेवाळाचं डबकं करायचं कि जीवनाची अनाहत नाद करणारी “नद” करायची हे ज्याचं त्यानं ठरवावं.शेवटी प्रत्येक कलेचा अंतिम हेतू हाच असतो.. “जो जे वांछील तो ते लाहो….”

srujan
https://wachankatta.com/2021/SRUJANAKSHAR%20TRAIMASIK%202/mobile/index.html

सृजन परिवार त्रैमासिक अंक २ पूर्ण वाचण्याकरिता इथे क्लिक करा !

राजेश देशपांडे 

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !